ETV Bharat / city

Ambadas Danve criticism Shinde group आमचा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होईल, शिवसेनेचा पत्ता शिवसेना भवनच असल्याचा अंबादास दानवेंचा खुलासा

Ambadas Danve criticism Shinde group शिवसेनेचे 39 आमदार घेऊन एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड केलं. स्वतःचा गट स्थापन केला. राज्याच्या जनतेला शिंदे गटाने केलेला गोहाटी, गोवा प्रवास देखील पाहावा लागला. त्यानंतर भाजपाने पाठीमागून साथ दिली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा याचं सरकार Shinde Group and BJP Govt आलं. शिंदे गटाला काही प्रमाणात पाठिंबाही मिळताना दिसत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि शिंदे गट यांच्यामधील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसतो आहे.

Ambadas Danve
Ambadas Danve
author img

By

Published : Aug 28, 2022, 9:24 AM IST

मुंबई शिवसेनेचे 39 आमदार घेऊन एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड केलं. स्वतःचा गट स्थापन केला. राज्याच्या जनतेला शिंदे गटाने केलेला गुवाहाटी, गोवा प्रवास देखील पाहावा लागला. त्यानंतर भाजपाने पाठीमागून साथ दिली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा याचं सरकार Shinde Group and BJP Govt आलं. शिंदे गटाला काही प्रमाणात पाठिंबाही मिळताना दिसत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि शिंदे गट यांच्यामधील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. त्याची एक झलक म्हणजे दसरा मेळावाच्या संदर्भात शिवसेनेला अजूनही शिवाजी पार्क मैदानाबाबत Shivaji Park Ground अनुमती मिळालेली नाही. आता तर शिंदे गटाने मध्यवर्ती कार्यालयासाठी ठाण्यातील टेंभी नाका आनंदाश्रम हा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाची एकेक बाब नियोजनपूर्वक करत असल्याचे त्यांच्या कृतीत दिसत आहेत.

शिवसेनाचा पत्ता कोणी पळवून घेऊ जावू शकत नाही शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या कार्यालयाचा पत्ता शिवसेना भवन Shiv Sena Bhavana दादर हाच ठेवला होता. मात्र शिंदे गटाने मुंबईच्या विभाग प्रमुख म्हणून यशवंत जाधव यांना जबाबदारी दिलेली आहे. यशवंत जाधव यांना जे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या नियुक्ती पत्रावर महाराष्ट्राचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय Maharashtra Shiv Sena Central Office म्हणजे ठाण्यातील तलाव पाळी, टेंभी नाका जवळील आनंद आश्रम हा पत्ता नमूद करण्यात आला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना पक्षविरोधी कारवाई केली, म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ते शिवसेनेच्या उपनेते या पदावर कार्यरत होते. मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता शिंदे गटाने ठाण्याला हलवल्यावर यासंदर्भात शिवसेनेचे विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी ई टीव्हीशी संवाद साधताना सांगितले की अख्ख्या भारतात शिवसेनेचा पत्ता शिवसेना भवनच आहे, हे जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची निशाणी कोणी घेऊन जाऊ शकत नाही ना शिवसेनेचा पत्ता कोणी पळून घेऊन जाऊ शकत नाही. अशा प्रकाराने शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही सर्व आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहोत.

शिवसेने पुढे दसरा मेळावा बाबत प्रश्नचिन्ह दरवर्षी शिवाजी पार्क मैदानामध्ये दादर या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. गेल्या 56 वर्षे शिवसेना दसऱ्याला हा मेळावा या ठिकाणी आयोजित करते. राज्यातल्या सर्व भागातून शिवसेनिक दसरा मेळाव्याला हजेरी लावतात. शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुन्हा ते उत्साहाने कामाला लागतात. यंदा 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवसेनेचा मेळावा होतोय. शिंदे गटाचा यावरनं प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याचं कारण शिवसेनेने 5 ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्याची अनुमती मिळावी म्हणून केलेल्या अर्जावर अद्यापही महानगरपालिकेकडून कोणतेही कार्यवाही झालेली दिसत नाही. याबाबत देखील अंबादास दानवे यांनी सांगितले आहे की, गेल्या अनेक वर्षे सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होतोय. ही परंपरा मोडली जाणार नाही, आमचा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होईल, असा विश्वास देखील त्यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना व्यक्त केला आहे.

हेही वाचा haryana govt seeking cbi probe हरियाणा सरकार सोनाली फोगट हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.