ETV Bharat / city

Kamini Shewale on Rahul Shewale Allegation : राहुल शेवाळेंवर केलेले आरोप निराधार - कामिनी शेवाळे - Rape Allegation On Rahul Shewale

शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena rebel MP Rahul Shewale ) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर शेवाळे आणि संबंधित महिलेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पतीच्या बचावासाठी आता पत्नी कामिनी शेवाळे पुढे सरसावल्या आहेत. शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार असल्याचे शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे ( Kamini Shewale ) यांनी म्हटले आहे.

Kamini Shewale
कामिनी शेवाळे
author img

By

Published : Jul 20, 2022, 3:37 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena rebel MP Rahul Shewale ) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर शेवाळे आणि संबंधित महिलेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पीडित महिलेनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर पतीच्या कारनाम्यावर पांघरूण टाकण्यासाठी पत्नी कामिनी शेवाळे ( Kamini Shewale ) पुढे सरसावल्या आहेत. गेल्या वीस वर्षे राजकारणात असलेल्या पतीची प्रतिमा मलीन करण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे, असा आरोप कामिनी शेवाळे यांनी केला आहे. तसेच संबंधित महिलेवरती सायबर सेलकडून ( Cyber Cell ) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केलेले आरोप निराधार - काही दिवसांपूर्वी एका पीडित महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप ( Rape Allegation On Rahul Shewale ) केला होता. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आत्महत्येचा इशाराही महिलेने दिला आहे. त्यानंतर राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी या पतीसाठी पुढे आल्या आहेत. शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार असल्याचे शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी म्हटले आहे.

काय म्हटले कामिनी शेवाळे यांनी ? - खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

जीवे मारण्याची धमकी - सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न - प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते!

हेही वाचा - Shiv Sainik wrote letter to Uddhav Thackeray: आम्ही तुमच्यासोबत... कोल्हापुरातील शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.