मुंबई - 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आरोपी सरदार खानच्या वक्तव्यावर ईडीने विश्वास ठेवून नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणात दुसरा कोणी साक्षीदार ईडीला मिळाला नाही का?, असा सवाल नवाब मलिकांच्या ( Nawab Malik ) वकिलांने आज ( 29 जुलै ) न्यायालयात ( Session Court ) सुनावणी दरम्यान ईडीला विचारला आहे. यावरती पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे.
प्लंबरच्या वक्तव्याच्या आधारे ईडीकडून अटक - माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज ( 29 जुलै ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही 23 वर्षे पूर्वी दिलेल्या वक्तव्याच्या आधारे करण्यात आली आहे. मुनिरा प्लंबरच्या वक्तव्याच्या आधारे ईडीकडून अटक करण्यात आली, असल्याचा देखील युक्तिवाद अमित देसाई यांनी केला आहे.
मलिकांवर कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप? - नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Arjun Khotkar : अर्जुन खोतकर 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत; तर जालन्यात शिवसेना सक्रिय