ETV Bharat / city

Anil Parab appeal ST employees: 31 मार्चपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, परीवहन मंत्र्याचे आवाहन - एसटी कर्मचारी कामावर रुजू आवाहन अनिल परब

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. तरीही कर्मचाऱ्यांबाबत कोणताही राग मनात नाही. कर्मचाऱ्यांमध्ये काही लोक गैरसमज पसरवत आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab appeal ST employees ) यांनी दिले.

anil parab on st employees Salary
एसटी कर्मचारी पगार अनिल परब प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 26, 2022, 7:05 AM IST

मुंबई - गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. तरीही कर्मचाऱ्यांबाबत कोणताही राग मनात नाही. कर्मचाऱ्यांमध्ये काही लोक गैरसमज पसरवत आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab appeal ST employees ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

प्रतिक्रिया देताना परीवहन मंत्री अनिल परब

हेही वाचा - ST Worker Strike : अनिल परबांच्या 'त्या' वक्तव्यावरुन एसटी कर्मचारी संतापले; म्हणाले, परिवहन मंत्री खोटारडे...

एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतरही त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरूच राहील, असेही अनिल परब ( Anil Parab ) यांनी सांगितले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परीवहन मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांना हे आवाहन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्वाचे निर्णय घेतले असून, सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकार करणार आहे. तसेच, कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासाबाबतची महत्त्वाची भूमिका बजावली होती. या काळादरम्यान जवळपास 308 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले आहे. तसेच, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अनुकंपाद्वारे नोकरी देण्यात येणार आहे. तसेच, मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा - Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धुडकावली, म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.