ETV Bharat / city

Rituja Latke: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक.. शिवसेनेचा 'गेमचेंजर प्लॅन' तयार.. भाजप- शिंदे गट जाणार बॅकफूटवर.. अनिल परब म्हणाले..

author img

By

Published : Oct 12, 2022, 4:12 PM IST

मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडणुकीच्या ( Andheri East Assembly By-Election ) मैदानात मशाल विरुद्ध ढाल-तलवार ( Torch vs shield sword ) अशी लढत होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी मुंबई अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटातील पहिली लिटमस टेस्ट पाहायला मिळणार आहे.

अनिल परब
अनिल परब

मुंबई - महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर मुंबईच्या निवडणुकीच्या ( Andheri East Assembly By-Election ) मैदानात मशाल विरुद्ध ढाल-तलवार ( Torch vs shield sword ) अशी लढत होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी मुंबई अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटातील पहिली लिटमस टेस्ट पाहायला मिळणार आहे. मात्र, या निवडणुकीआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामाचा मुद्दा आता समोर आला आहे. लटके या बृहमंत्री महानगरपालिकामध्ये लिपिक ( Clerk in Brihamantri Municipal Corporation Latke ) म्हणून कार्यरत होत्या. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा न स्वीकारल्यामुळे आता त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करणे कठीण झाल आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अनिल परब, खासदार अरविंद सावंत, रवींद्र वायकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन न्यायालयीन लढायची तयारी दाखवली आहे.

ऋतुजा लटक्यांना उमेदवारी - यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब म्हणाले की, "रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेच्या वतीने ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. सर्वात लहान वयात शाखा प्रमुख म्हणून अंधेरीमध्ये काम केलं. एकनिष्ठ म्हणून रमेश लटके यांनी काम केलं. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना उमेदवारी जाहीर केली. त्या पालिकेत लिपिक पदावर काम करत आहेत. 2 सप्टेंबर 2022 ला राजीनामा दिला. त्यानंतर त्या राजीनामा फाईल घेऊन गेल्या तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की राजीनामा स्वीकारला जाऊ शकत नाही."

अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव - पुढे बोलताना परब म्हणाले की, "3 ऑक्टोबर 2022 ला राजीनामा दिला. राजीनामा देताना 1 महिन्याचा अवधी द्यावा लागतो. तो त्यांनी दिला होता. जर एक महिना अवधी होत नसेल तर 1 महिन्याचा पगार कोषागारात जमा करायचा असतो. त्याबाबत सर्व काही क्लीअर आहे. सगळी फाईल तयार आहे. परंतु राजीनामा स्वीकारला जात नाही आहे. अधिकाऱ्यांना राजीनामा स्वीकारू नका असे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव आहे." असा आरोप आमदार अनिल परब यांनी केला आहे.

पालिकेच्या अधिकाऱ्यांचे ऑफ रेकॉर्ड माहिती - "राजीनाम्याची फाईल आयुक्तांकडे जायला नको. जॉईंट आयुक यांच्याकडे हा राजीनामा स्वीकार होतो. ऋतुजा लटके यांना शिंदे गट आमिष देत आहेत असं बातम्यांमध्ये वाचलं. मंत्री पद देतो असं आमिष देत आहेत. जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही आहे. या विरोधात आज आम्ही कोर्टात गेलो आहोत. आमचे सगळे प्लॅन तयार आहेत, वेळ आल्यावर कळेल. अंधेरीची जागा शिवसेना ही लढणार ऋतुजा लटके यांच्याशी सततचं बोलणं चालू आहे. ऋतुजा लटके शिंदे गटाकडे जाणार म्हणजे राजीनामा स्वीकारणार? याचा अर्थ काय होतो? आम्ही जेवढ्या अधिकाऱ्यांना भेटल त्यांनी सांगितलं की आयुक्तांचे आदेश आले की राजीनामा स्वीकारू नये असं सांगितलं." असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

आम्ही न्यायालयात न्याय मागू - "शिवसेनेचं संघर्षातुन जन्म झाला आहे. चिन्हावर संघर्ष झाला तर लढू. निवडणूक आयोगाने जर ते चिन्ह दिलं असेल तर विचार करूनच दिलं असेल. ताबडतोब राजीनामा मंजूर करावा अशी मागणी कोर्टात केली आहे. आम्ही कोर्टात गेलो आहे कोर्टाकडे आम्ही न्याय मागू. सतत ऋतुजा लटके आमच्या सोबत आहेत त्या ठाम आहेत. बाहेर अपप्रचार होत आहेत परंतू ऋतुजा लटके ठाम आहेत. त्यांच्या राजीनामा चुकीचा होता तर त्यांना आदीच तसे कळवायला पाहिजे होते परंतु आज उद्या करत राहिले त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो." असा आरोप अनिल पर्व यांनी पालिका अधिकाऱ्यांवर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.