ETV Bharat / city

मुंबईत मुसळधार..! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद, न्यायालयासही सुट्टी

author img

By

Published : Sep 23, 2020, 9:18 AM IST

Updated : Sep 23, 2020, 4:31 PM IST

मुसळधार पावसाने शहरात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सायन कुर्ला, चुनाभट्टी, मस्जिद स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सीएसएमटी ठाणे आणि सीएसएमटी वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दादर हिंदमाता, किंग सर्कल, सायन रोड नंबर २४, मालाड सबवे, वांद्रे टॉकीज, शास्त्री नगर गोरेगाव, अंधेरी सबवे आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील रस्ते आणि बेस्ट वाहतूक वळवण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद

मुंबई - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.

heavy rainfall mumbai
मुंबईत मुसळधार..
  • मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू;एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात.
    • कालपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू; @NDRFHQ च्या पाच तुकड्या तैनात. नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री @VijayWadettiwar यांचे आवाहन#MumbaiRains pic.twitter.com/pgcg369ZJu

      — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • उच्च न्यायालयातील आज होणाऱ्या सर्व सुनावण्या रद्द; मुख्य न्यायाधीशांनी न्यायालयीन कामाकाजाला सुट्टी केली जाहीर
  • सकाळी ८. १५ नंतर चर्चगेट आणि दादर स्थानाकातून धावणाऱ्या सर्व लोकल रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
    heavy rainfall mumbai
    मुंबईत मुसळधार..

  • शहरात आणि रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने मध्य रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल केला आहे. त्यामध्ये मुंबई भुवनेश्वर या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हावडा-मुंबई आणि हैदराबाद-मुंबई या ठाणे ठाणे स्टेशनपर्यंत धावतील तर गदग-मुंबई कल्याणपर्यंत धावेल.
    मुंबईत मुसळधार

  • गेल्या २४ तासात मुंबईत १७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
  • मुंबईतील नायर रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये शिरले पावसाचे पाणी
    • #WATCH Maharashtra: Mumbai's Nair Hospital flooded following heavy rainfall in the city. It is a COVID-19 dedicated hospital.

      As per Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Mumbai city received 173 mm rainfall in the last 24 hours. pic.twitter.com/DLPOWe2gPc

      — ANI (@ANI) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • मुंबईतील वाहतूक वळवली.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. गेल्या २४ तासात शहरात २६७.६२, पूर्व उपनगरात १७३.२२ तर पश्चिम उपनगरात २५१.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने शहरात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सायन कुर्ला, चुनाभट्टी, मस्जिद स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सीएसएमटी ठाणे आणि सीएसएमटी वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दादर हिंदमाता, किंग सर्कल, सायन रोड नंबर २४, मालाड सबवे, वांद्रे टॉकीज, शास्त्री नगर गोरेगाव, अंधेरी सबवे आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील रस्ते आणि बेस्ट वाहतूक वळवण्यात आली आहे. याबाबत मुंबई पालिकेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

  • Maharashtra: Mumbai's Nair Hospital flooded following heavy rainfall in the city. It is a COVID-19 dedicated hospital.

    As per Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Mumbai city received 173 mm rainfall in the last 24 hours. pic.twitter.com/Y2YdYXls9n

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज २३ सप्टेंबर रोजी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Last Updated : Sep 23, 2020, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.