ETV Bharat / city

मुंबईतील आतापर्यंतच्या इमारत कोसळल्याच्या दुर्घटना!

author img

By

Published : Jun 10, 2021, 8:30 PM IST

मुंबईत अनेक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत इमारत दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर येत असते.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई - मुंबईत अनेक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत इमारत दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर येत असते. आज (10 जून २०२1) रोजी मालाड मालवणी परिसरात असलेली दोन मजली इमारत कोसळली असून, यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारे मुंबईत दरवर्षी अनेक इमारत दुर्घटना घडत आहेत.

  • 10 जून 2021 -

मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणी परिसरात दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत.

  • 21 सप्टेंबर 2020 -

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला होता. भिवंडीमधील पटेल कंपाऊडमध्ये ही घटना घडली होती. जिलानी नावाची ही इमारत होती.

  • 25 ऑगस्ट 2020 -

महाड येथील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यात निष्पाप १६ जणांचे बळी गेले होते. तर ९ जण गंभीर जखमी झाले. बांधकाम निकृष्ट असल्याने अवघ्या ९ वर्षांत ही इमारत कोसळली. त्यामुळे संबंधित बिल्डर्ससह अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  • 31 ऑगस्ट 2017 -

मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत कोसळली. यात 24 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, अनेकजण जखमी झाले होते.

  • 25 जुलै 2017 -

घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर दामोदर पार्क येथील ‘साईदर्शन’ ही चार मजली इमारत कोसळली होती. यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. तळमजल्यावरील नर्सिंग होममध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असताना पिलर्सची मोडतोड केल्यामुळे इमारत कोसळल्याचे सांगण्यात आले होते.

  • 4 ऑगस्ट 2015 -

ठाणे रेल्वे स्टेशनजवळील 50 वर्ष जुनी इमारत कोसळली होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले होते.

  • 27 स्पटेंबर 2013 -

मुंबईतील माझगाव भागातील पाच मजली इमारत कोसळली होती. यात जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला होता, तर 32 जण जखमी झाले होते.

  • 4 एप्रिल 2013 -

ठाण्यातील मुंब्रा भागात मोडकळीस आलेली इमारत कोसळली होती. यात 74 जणांचा मृत्यू झाला होता. यात 18 लहान मुलं, 33 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश होता. तर, 100 पेक्षा अधिक जण या दुर्घटनेत जखमी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.