ETV Bharat / city

Alka Mittal first Woman Head For ONGC : अलका मित्तल ठरल्या 'ओएनजीसी'च्या पहिल्या महिला अध्यक्ष - अलका मित्तल ONGC च्या अध्यक्ष

ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन (ONGC) कंपनीच्या अध्यक्ष आणि संचालकपदी अलका मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Alka Mittal first Woman Head For ONGC) या नियुक्तीमुळे, (Alka Mittal Head For ONGC) मित्तल या ओएनजीसीच्या इतिहासात पूर्णवेळ संचालकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

अलका मित्तल ठरल्या ओएनजीसीच्या पहिल्या महिला अध्यक्ष

author img

By

Published : Jan 4, 2022, 1:29 PM IST

Updated : Jan 4, 2022, 2:18 PM IST

मुंबई - सुभाष कुमार यांच्या जागी अल्का मित्तल यांची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Alka Mittal Head For ONGC) याबाबत 3 जानेवारीला कंपनीने अधिकृत घोषणा केली. या (Alka Mittal first Woman Head For ONGC) नियुक्तीमुळे, मित्तल या ओएनजीसीच्या इतिहासात पूर्णवेळ संचालकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान, ही नियुक्ती सहा महिने किंवा या पदासाठी नियमित नियुक्ती जाहीर होईपर्यंत असेल अस कंपनीने यामध्ये म्हटले आहे.

कुमार देखील डिसेंबरच्या अखेरीस निवृत्त झाले

31 मार्च 2021 रोजी शशी शंकर प्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यापासून (ONGC)कडे पूर्णवेळ (Oil and Natural Gas Company) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नव्हेत. सामान्यतः, पदावर असलेल्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या किमान काही महिने आधी भावी प्रमुखाची निवड होते. परंतु, यावेळी शंकर यांच्या निवृत्तीनंतर, तत्कालीन ज्येष्ठ संचालकांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. माजी संचालक सुभाष कुमार(वित्त विभाग) यांच्याकडे ( 1 एप्रिल 2021)ला या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. परंतु, कुमार देखील डिसेंबरच्या अखेरीस निवृत्त झाले, त्यामुळे हे पद काही दिवस रिक्त होते. त्यावर आता मित्तल यांची निवड झाली आहे.

3 जानेवारीला आदेश जारी करण्यात आला

मित्तल या सध्या संचालक मंडळातील सर्वात वरिष्ठ आहेत. हीच बाब लक्षात घेऊन त्यांना सीएमडीचे पद दिले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. (Director Entrusted With Additional Charge of ONGC CMD) मात्र, वेगळा काही निर्णय होतो का अशीही शंका व्यक्त केली जात होती. परंतु, मित्तल यांच्याकडेच हा पदभार देण्यात आला. त्याबाबतचा औपचारिक आदेश 3 जानेवारीला जारी करण्यात आला.

समीतीला योग्य उमेदवार आढळला नाही

निवड मंडळाकडे,( PSU)प्रमुख पदासाठी 10 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर मे-जून 2021 दरम्यान, यासंबधी मुलाखती झाल्या. मात्र, यामध्ये निवड समीतीला योग्य उमेदवार आढळला नाही. त्यानंतर काही नावांशी शिफारस करण्यात आली.

अलका मित्तल यांचा प्रवास

अलका मित्तल या अर्थशास्त्रात पदव्युत्तर ( MBA) झालेल्या आहेत. तसेच, त्यांनी वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासात डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. दरम्यान, त्यांनी 1985 मध्ये (ONGC)मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश घेतला.

मुख्य कौशल्य विकास (CSD)चा कार्यभार

संचालक (एचआर) म्हणून रुजू होण्यापूर्वी, मित्तल यांनी कंपनीच्या मुख्य कौशल्य विकास (CSD)चा कार्यभार सांभाळला. (CSD)प्रभारी म्हणून त्यांच्या काम केले. या काळात त्यांनी (ONGC)च्या कौशल्य विकास केंद्रांच्या कार्यामध्ये एकसमानता आणली आहे. अस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.

कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या त्या प्रमुख

यापूर्वी, मित्तल यांनी वडोदरा, मुंबई, दिल्ली आणि जोरहाटसह विविध क्षेत्रांमध्ये HR-ER फंक्शन्सचे नेतृत्व केले आहे. तसेच, 2009 मध्ये (ONGC)च्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या त्या प्रमुख देखील होत्या.

हेही वाचा - Wankhede Transferred In DRI : वानखेडे यांची बदली, बृजेंद्र चौधरींकडे NCB Zonal Director पदाचा अतिरिक्त कार्यभार

Last Updated : Jan 4, 2022, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.