मुंबई - येत्या तीन जानेवारीपासून 'आयआयटी मुंबई'मध्ये 'टेक-फेस्ट'ला सुरूवात होत आहे. जगभरातील वैज्ञानिक या प्रदर्शनामध्ये आपापले संशोधन सादर करणार आहेत. यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे, 'अल्बर्ट आईनस्टाईन'. तीन ते पाच जानेवारीदरम्यान हे प्रदर्शन असणार आहे.
आईनस्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचे निधन होऊन आता बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र ते अजूनही जगभरातील सर्व वैज्ञानिकांना आणि विज्ञानप्रेमींना प्रेरणा देत असतात. 'आयआयटी टेकफेस्ट'ला 'अल्बर्ट आईनस्टाईन' येणार आहेत, म्हणजेच, आईनस्टाईन हा मानवी चेहऱ्याचा रोबोट या प्रदर्शानमध्ये सादर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी प्लास्टिकपासून तयार केले रोबोट
या रोबोटला विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे, ज्याद्वारे तो मानवी चेहऱ्यांवरील दहा लाखांपेक्षा जास्त भावना ओळखू शकतो. त्यामुळे, त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती ही स्त्री आहे की पुरूष, आनंदी आहे की दुःखी आहे हे आईनस्टाईन अचूकपणे ओळखू शकतो. हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स कंपनीने बनवलेला हा रोबोट, ५ जानेवारीला टेक-फेस्टमध्ये सादर केला जाईल. त्यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील तो देणार आहे.
हेही वाचा : विदर्भातील कन्या रोबोटिक्स स्पर्धेसाठी सज्ज