ETV Bharat / city

Ajit Pawar Criticized : राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडला; शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत : अजित पवारांची टीका

विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी नवीन सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्याला अतिवृष्टीचा ( Heavy Rains ) फटका बसला आहे. शेतकऱ्याला तातडीने मदतीची गरज ( Farmers Need Urgent Help ) असताना, त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. मंत्रिमंडळाचा अजून विस्तार नाही, त्यामुळे अनेक निर्णय लांबले आहेत. त्यामुळे या राज्याचा कारभार सुरळीत सुरू नाही.

Opposition Leader Ajit Pawar
विरोधी पक्ष नेते अजित पवार
author img

By

Published : Jul 28, 2022, 9:44 AM IST

मुंबई : राज्याला अतिवृष्टीचा फटका ( State has been Hit by Heavy Rains ) बसला आहे. शेतकऱ्याला आणि सामान्य नागरिकाला तातडीने मदतीची ( Farmers Need Urgent Help ) गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ( Deputy CM Devendra Phadnis ) यांनी दौरा करून पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरी अद्यापि मदत दिली गेलेली नाही. सत्ता स्थापन करूनही अनेक दिवस उलटून गेले तरी अद्यापि मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळेच अनेक निर्णय खोळंबून राहतात. राज्याचा कारभार योग्यरित्या होत नाही, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी एकनाथ शिंदे सरकारला लगावला आहे.

केवळ सह्या करायला दिवस पुरायचा नाही : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा कारभार केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणे अशक्य आहे. प्रत्येक विभागाचे निर्णय घेण्यासाठी संपूर्ण दिवस मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना निर्णयांवर सह्या कराव्या लागल्या तरीही ते शक्य होणार नाही एवढा प्रचंड कामाचा पसारा असतो. यामुळेच राज्याचा कारभार योग्यरित्या चालू नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नवीन सरकारवर केली आहे.

महाविकास आघाडीने नैसर्गिक आपत्तीत केली जास्त मदत : मदत महाविकास आघाडी सरकार असताना नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर एनडीआरएफचे निकषाच्या दुप्पट ते अडीचपट मदत तत्कालीन राज्यसरकारने केली असल्याची आठवण अजित पवारांनी करून दिली. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवीन सरकारच्या कारभारावर अजित पवार यांनी बोट ठेवले.

मंत्रिमंडळ विस्तार करणार म्हणतात, पण करीत नाहीत : बहुमत चाचणीदरम्यान एकनाथ शिंदे सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. मग असे असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांत राज्याचा गाडा हाकत आहे. आताच्या परिस्थितीत 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री असते, तर प्रत्येक जिल्ह्याचा आढावा तत्काळ घेता आला असता. तातडीने पालकमंत्र्यांना निर्णय घेता आले असते.

उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात मश्गुल : आजही आपण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, मुख्यमंत्री सातत्याने विस्तार केला जाईल तसेच सांगत आहेत. मात्र, विस्तार करीत नाहीत. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही पक्षाचे आमदार केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात मश्गुल आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर आमचे लक्ष : दोन्ही पक्षाकडील आमदारांना कोणाला कोणते मंत्रिपद मिळेल याकडेच लक्ष असल्याचा चिमटा अजित पवारांनी यावेळी काढला. तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बोलणं आवश्यक असूनही अद्याप अधिवेशन बोलावले जात नसल्याची टीकाही अजित पवारांनी केली.

चार दिवसीय दौरा करणार : राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार 28 जुलै ते रविवार 31 जुलैपर्यंत विदर्भ दौरा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे आणि इतरही राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत असतील. यावेळी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणार असून, अधिवेशनात राज्यातील सत्य परिस्थिती विधिमंडळासमोर आणणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : MH Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द; नैसर्गिक आपत्तीचे संकट असतानाही मंत्रिमंडळाचा पेच कायम

हेही वाचा : Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.