ETV Bharat / city

अजित पवारांचे हे बंड पहिलेच नाही.. यापूर्वीही काका-पुतण्यामध्ये पडली होती फूट - इतक्या वेळा अजित पवारांनी केली बंडखोरी

या काका-पुतण्या मतभेदांचा नवा अंक सध्या पहायला मिळत आहे. शुक्रवारनंतर (22 नोव्हेंबर) एका रात्रीत अजित पवारांनी थेट भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपद मिळवले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

इतक्या वेळा अजित पवारांनी केली बंडखोरी
author img

By

Published : Nov 23, 2019, 10:02 PM IST

मुंबई - शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी भूमिका अनेकदा घेतली आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्या वादावर पडदा टाकून 'आमच्या घरात आणि पक्षात कोणतेही वाद नाहीत. आमच्या घरात कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम मानला जातो आणि आमचे कुटुंबप्रमुख शरद पवार हे आहेत,' अशी सारवासारव अजित पवारांकडून करण्यात आली आहे.

या काका-पुतण्या मतभेदांचा नवा अंक सध्या पहायला मिळत आहे. शुक्रवारनंतर (22 नोव्हेंबर) एका रात्रीत अजित पवारांनी थेट भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपद मिळवले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

2 वेळा तडकाफडकी दिला होता राजीनामा

2012 : अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता.

2019 : 27 सप्टेंबरला अजित पवारांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला होता. या सुमारास अजित पवार आणि शरद पवारांवर ईडीकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित एका प्रकरणात भ्रष्टाचाराचा अहवाल सादर करण्यात आला होता. या वेळी, शरद पवारांनी आपला बँकेशी काहीही संबंध नसल्याचे तसेच, आपण या बँकेच्या संचालक मंडळावरदेखील कधीही नसल्याचे सांगितले होते. आपण कुठल्याही चौकशीला तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

राजीनाम्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट केली होती. त्या वेळी, ते भावूकही झाले होते. 'माझ्यामुळे शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने मी व्यथित होऊन राजीनामा देत आहे,' असे अजित यांनी म्हटले होते. तसेच, निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर 'राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार जे सांगतील तो निर्णय मला मान्य असेल' असे ते म्हणाले होते.

तर, अजित यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण आपल्याला माहीत नसल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. यानंतर काका-पुतण्यांचे बोलणे होऊन अजित यांनी राजीनामा मागे घेतला होता.

काका-पुतण्यांमधील मतभेद

2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद प्रकर्षाने समोर आले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येणे अपेक्षित होते. यासाठी अजित पवार आग्रही होते. ते मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असल्याचीही मोठी चर्चा होती. मात्र, शरद पवार यांनी काँग्रेसशी बोलणी करून राज्याचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. त्याबदल्यात २ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद जास्तीचे पदरात पाडून घेतले. यावरून पवार काका-पुतण्यांमधील मतभेद राज्याच्या समोर आले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना मावळमधून हट्टाने तिकिट दिले होते. प्रत्यक्षात शरद पवार यांचा पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध होता. तरीही पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवलीच. त्यात ते पराभूत झाले. यावेळी काका-पुतण्यामधील मतभेद उघड झाला होता.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.