मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या ( Vadu Budruk Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial ) शौर्याचा, पराक्रमाचा आणि त्यागाचा इतिहास दर्शवणारे सुसज्ज स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक पुणे जिल्ह्यातील हवेली येथे वडु बुद्रुक ( Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Vadu Budruk ) या गावात उभारले जाणार आहे. दरवर्षी हजारो लोक तुळापूर येथील महाराजांच्या समाधीस्थळावर दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे वडु बुद्रुक येथेही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुसज्ज स्मारक उभारण्यात येणार असून पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत नुकतीच बैठक झाल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
हेही वाचा -Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यपालांना साकडे
छत्रपती संभाजी राजेंच्या पराक्रमाला, रागाला, शौर्याला आणि अभ्यासू वृत्तीला साजेसे स्मारक उभारले जाणार आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तम आराखड्यास मान्यता देऊन त्यानुसार स्मारक उभारले जाणार आहे. विरोधकांनीही या घोषणेचे स्वागत ( Assembly Opponents welcome the decision ) करीत स्मारकाचे काम सूचित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार अजित पवार यांची घोषणा - वडु बुद्रुक पुणे जिल्हा
वडु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक ( Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj ) उभारणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar announcement ) यांनी विधानसभेत केली. छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि सुसज्ज स्मारक पुणे जिल्ह्यातील वडु बुद्रुक ( Vadu Budruk in Pune district ) येथे उभारण्यात येणार असून त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.