ETV Bharat / city

Supreme Court Petition : याचिका रद्द करण्यासंदर्भात शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार असतांनाच, शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळून (Ahead of quashing the petition) लावण्याची विनंती, शिंदे गटाने केली आहे. यासाठी शिंदे गटाने शनिवारी एक याचिका (the Shinde group approached the Supreme Court) दाखल केली.

author img

By

Published : Aug 2, 2022, 6:42 PM IST

Supreme Court petition
सर्वोच्च न्यायालय

मुंबई : राज्यातील सत्तांतर नाट्यदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातर्फे, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिंदे गटातील 16 आमदारांचे निलंबन यांच्यासह, इतर पाच याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळून (Ahead of quashing the petition) लावण्याची विनंती, शिंदे गटाने केली आहे. यासाठी शिंदे गटाने शनिवारी एक (the Shinde group approached the Supreme Court) याचिका दाखल केली.

ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या नोटीस विरोधात, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता उद्या 3 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिका फेटाळून लावण्यात यावी. तसेच त्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे व उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्याची विनंती त्यातून करण्यात आली आहे.

खरी शिवसेना कुणाची? यासंबंधीचा निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला दिली जावी, अशी विनंती देखील याचिकेत करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने पक्षात झालेल्या विभाजनाच्या मुद्दयावर न्यायालयाने हस्तक्षेप करून नये, अशी विनंती देखील शिंदे गटाने केली आहे. लोकशाहीतील संसदीय स्वरुपात कुठल्याही कारवाईला वैध अवैध ठरवण्यासाठी ज्यांच्याकडे बहुमत नाहीत. अथवा ज्यांनी बहुमत गमावले, असा गट दबाब टाकू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा गट लोकशाहीतील निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. सदस्यांनी स्वेच्छेने घेतलेल्या निर्णयाला या गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुमतात असलेल्या या सरकारला ठाकरे अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा शिंदे गटाने प्रतिज्ञापत्रातून केला आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टला शिवसेनेसंबंधीच्या वादावर दोन्ही गटाकडून दावे तसेच हरकती मागवून घेत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अपात्र आमदारांसंबंधी निकाल येईस्तोवर निवडणूक आयोगाला कुठलाही निर्णय सुनावण्यापासून रोकण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. पंरतु 15 आमदार 39 आमदारांच्या गटाला बंडखोर म्हणू शकत नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाने प्रतिज्ञापत्रातून केला आहे. आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून नये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीचा देखील प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून कोश्यारी यांच्या निर्णयाला देखील आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेसंबंधीत सर्व याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार होती. पंरतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने उद्या 3 ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी होईल. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वत: लाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. अशातच उद्या 3 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.