मुंबई मुंबईतील कांदिवली परिसरातील क्रीडांगणावर फाल्गुनी पाठक यांच्या दांडिया नित्याचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक क्रीडांगणावर नागरिकांना प्रवेश करण्याकरिता कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
मोफत प्रवेश देण्याचे निर्देश कांदिवली येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलाचे व्यावसायिक शोषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रीदरम्यान दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी गीतकार फाल्गुनी पाठक परफॉर्मन्स साठी येणार आहे. या जनहित याचिकेमध्ये अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने क्रीडांगणावर अशा सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित ठिकाण खेळाचे मैदान म्हणून आरक्षित सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप यांनी वकील मयूर फारिया यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकास आराखड्यात संबंधित ठिकाण खेळाचे मैदान म्हणून आरक्षित केले आहे. सानप यांना मीडिया रिपोर्ट्स आणि बुकिंग प्लॅटफॉर्मवरून आयोजक, बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, फाल्गुनी पाठक यांच्यासोबत नवरात्रोत्सवाचे 10 दिवस या क्रीडांगणावर आयोजन करण्याच्या अर्जाविषयी माहिती मिळाली कार्यक्रमाच्या तिकीटाची किंमत 800 ते 4200 इतकी आयोजकांकडून ठेवण्यात आली आहे.
सर्वांसाठी खुले ठेवण्यात यावे अशी मागणी खेळाचे मैदान सर्वांसाठी नेहमीच खुले असले पाहिजे. तसेच मैदानाची इतर कोणत्याही व्यक्तींकडून व्यावसायिकरित्या शोषण केले जाऊ नये, जर ते मूळ उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जात असेल. सध्याच्या बाबतीत जर ते संगीत कार्यक्रम नवरात्र उत्सवासाठी वापरले जात असेल, तर हे मैदान सर्वांसाठी खुले ठेवण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने क्रीडांगणांच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. मात्र त्याचे पालन केले जात नाही. व्यावसायिक कार्यक्रमांना परवानगी भेदभावपूर्ण पद्धतीने प्रशासनाकडून दिली जात असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असे देखील याचिकेत म्हटले आहे.
जनहित याचिका दाखल इतर व्यक्तीकडून आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांच्या वेळी हे क्रीडांगण मोठ्या प्रमाणावर नागरिकांसाठी बंद असते. असे आयोजकांकडून कोणत्याही पारदर्शकतेशिवाय सार्वजनिक खर्चाने अशा कार्यक्रमांमधून कमाई करतात. त्यामुळे त्याच्या व्यावसायिक शोषणाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली असे सानप यांनी म्हटले आहे.