ETV Bharat / city

Mosques Loudspeaker Azaan Mumbai : मुंबईत राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 135 मशिदींवर भोंग्यांव्दारे अजान

author img

By

Published : May 4, 2022, 3:10 PM IST

मुंबईतील 1144 मशिदीपैकी केवळ 135 मशिदीवरील भोंग्यांव्दारे अजान देण्यात आले. राज ठाकरे यांनी ( MNS chief Raj Thackeray ) दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलिसांनी मनसेसैनिकांना ( Mumbai police arrested MNS Worker ) धरपकडीची कारवाई सुरू केली. मुंबईतील अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहे.

file photo
file photo

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलना संदर्भात आज (बुधवारी) दिलेल्या इशारा नंतर मुंबईतील 1144 मशिदीपैकी केवळ 135 मशिदीवरील भोंग्यांव्दारे अजान देण्यात आले. राज ठाकरे यांनी ( MNS chief Raj Thackeray ) दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलिसांनी मनसेसैनिकांना ( Mumbai police arrested MNS Worker ) धरपकडीची कारवाई सुरू केली. मुंबईतील अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहे.

मुंबई पोलिसांनी 806 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. 1144 मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुंबईतील 1144 मशिदींपैकी 135 मशिंदीकडून आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. मुंबईतील 135 मशिदींवर आज पहाटे 6 वाजण्यापूर्वीच भोंगे वाजल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे या मशिदींवरील संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस यांच्याकडून मशिदीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच अनेक मनसैनिकांना देखिल ताब्यात घेण्यात आले होते. कुठलेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे तयार असल्याचे चित्र दिसून आले. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागांमध्ये गस्त घातली. तसेच परिस्थितीचा आढावा देखील घेतला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईत कुठल्याही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा - Raj Thackeray PC :...तोपर्यंत हनुमान चालीसा चालूच राहणार; 135 मशिदींवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.