ETV Bharat / city

Eknath Shinde : शिवसेनेतील नऊ मंत्री शिंदे गटात सामील; उरले फक्त मंत्री आदित्य ठाकरे - Uddhav Thackeray Fails

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ( After The Revolt of Eknath Shinde ) शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली. आज बंडखोरीचा सातवा दिवस ( The Seventh Day of The Rebellion ) असून, आतापर्यंत आदित्य ठाकरे वगळता ( Remaining Minister Aditya Thackeray ) संपूर्ण मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहे. शिवसेनेसाठी हा मोठा हादरा मानला जात असून, पक्षाला लागलेली गळती रोखण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अपयशी ( Uddhav Thackeray Fails to Stop spill ) ठरल्याचे दिसत आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 26, 2022, 7:43 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ( After The Revolt of Eknath Shinde ) शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली. आज बंडखोरीचा सातवा दिवस ( The Seventh Day of the Rebellion ) असून, आतापर्यंत आदित्य ठाकरे वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठा हादरा मानला जात असून, पक्षाला लागलेली गळती रोखण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अपयशी ( Thackeray failed to stop the spill ) ठरल्याचे दिसत आहे.

भाजपसोबत युती करण्याचा मांडला प्रस्ताव : मविआ सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठून बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकरला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे ही भाजपसोबत युती करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत, शिवसेनेच्या ३७ आणि अपक्ष ९ आमदारांना गळाला लावले. शिवसेनेला त्यानंतर दिवसेंदिवस धक्के बसत आहेत.

युती तुटल्यानंतर शिवसेनेने केली आघाडी : शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करीत सरकार स्थापन केले. सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमानुसार शिवसेनेच्या वाट्याला दहा मंत्रीपदे आली. विधानसभेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री पक्षात शिल्लक आहेत. उर्वरित ९ मंत्री बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली आहे. आतापर्यंत ५२ आमदार शिंदे गटात सामील झाले असून, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ही गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. शिवसेनेतील एकूण 9 मंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक शिवसेनेतील मंत्र्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचे अख्ख मंत्रिमडळ रिकामे झाले आहे. बंडखोर मंत्री आणि आमदारांवर कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. मात्र, त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.

हे आहेत नऊ मंत्री

एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री
उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा मंत्री
संदीपान भुमरे - रोजगार हमी मंत्री
शंभुराज देसाई - गृह राज्यमंत्री
अब्दुल सत्तार - राज्यमंत्री
बच्चू कडू - राज्यमंत्री
दादा भूसे - कृषिमंत्री
राजेंद्र यड्रावकर - राज्य आरोग्यमंत्री

हेही वाचा : Maharashtra Political Crisis: ठाण्यातल्या तिन्ही बंडखोर आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.