ETV Bharat / city

After-The-Revolt-of-Eknath-Shinde : बंडखोर मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल; मान्सूनमध्ये जनहिताची कामे अडकू नये यासाठी निर्णय - Government Unstable

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ( After The Revolt of Eknath Shinde ) करीत वेगळा गट स्थापन केला. सरकार यामुळे अस्थिर ( Government Unstable ) झाले आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने जनहिताची कामे अडकू नयेत, ( Works Should Not Get Stuck ) यासाठी बंडखोर गटातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील खात्यात फेरबदल ( Reshuffle of Ministers Accounts ) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यांनी बंडखोर आमदारांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केली आहेत.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 27, 2022, 4:57 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत ( After The Revolt of Eknath Shinde ) वेगळा गट स्थापन केला. सरकार यामुळे अस्थिर ( Government Unstable ) झाले आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने जनहिताची कामे अडकू नयेत ( Works Should Not Get Stuck ) , यासाठी बंडखोर गटातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील खात्यात फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यांनी बंडखोर आमदारांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केली ( Reshuffle of Ministers Accounts ) आहेत.

कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांना अधिकार : सध्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल.

मान्सूनमधील कामे अडकू नये यासाठीचा निर्णय : त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे. त्यानुसार जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू ठेवण्यासाठी सर्व खाती फेरबदलाचा निर्णय घेतला आहे.

या मंत्र्यांकडे दिली खाते : एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्य मंत्र्याची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग : शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती - ( गृह व्यवहार (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकतास, मार्केटिंग) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती - विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य),

राज्य मंत्र्याची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग : अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती - प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य) ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.