ETV Bharat / city

Etv Bharat Special : निर्भया हत्याकांडानंतर राज्यात महिला अत्याचाराविरोधात कठोर नियम; मात्र अत्याचार सुरूच - Sakinaka Rape Case

शक्ती मिल (Shakti Mill Rape Case) मध्ये झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर राज्य सरकारकडून राज्यामध्ये निर्भया पथकाची (Nirbhaya Squad) निर्मिती करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनात महिला अत्याचाराविरोधात लढण्याकरिता नवीन शक्ती कायदा राज्यात लागू करणार आहे.

Nirbhaya massacre
Nirbhaya massacre
author img

By

Published : Dec 16, 2021, 10:59 AM IST

मुंबई - महाराष्ट्रामध्ये महिलेवरील अत्याचाराचे प्रमाण (Woman Rape Cases in Maharashtra) दिवसेंदिवस वाढतच आहे. शक्ती मिल (Shakti Mill Rape Case) मध्ये झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर राज्य सरकारकडून राज्यामध्ये निर्भया पथकाची (Nirbhaya Squad) निर्मिती करण्यात आली होती. तसेच महिलेवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यातच आता राज्य सरकार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महिला अत्याचाराविरोधात लढण्याकरिता नवीन शक्ती कायदा राज्यात लागू करणार आहे. जेणेकरून महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजेत.

राज्य सरकार कठोर नियम लागून सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. 2013 मध्ये शक्ती मिलमध्ये निर्भया हत्याकांड सारखी घटना घडली होती. साकीनाका, डोंबिवली, बीड या ठिकाणे झालेल्या लैंगिक अत्याचाराने पुन्हा एकदा महाराष्ट्राला निर्भया हत्याकांडाची आठवण करून दिली होती डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. तर बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 400 लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे. मात्र, तरीदेखील अशा घटना वाढत आहे हे महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये (Shakti Mill Compund Case) 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटोग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेप मध्ये परिवर्तन केली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुलीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी विजय फुके याने 29 जनेवारी रोजी तिच्या नकळत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या साथीने तिला थंडपेयातून नशेची पावडर तर कधी जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आपल्यावर अन्याय करणाऱ्या सर्व नराधमांची नावे या मुलीने पोलिसांना सांगितली असून, त्याआधारे पोलिसांनी 33 जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

बीडमध्ये मुलीवर 400 जणांकडून बलात्कार
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल 400 जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरणं समोर आलं आहे. पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)ची आकडेवारी
महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या देखील 2018 साली वाढली असून ती संख्या 378277 इतकी आहे. त्यापैकी 2018 भा. दं. वि. कलम 376 अन्वये नोंद झालेले बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण 33356 इतके आहे. 2017 साली ती संख्या 359849 इतकी होती.

मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते जुलै 2020 या सात महिन्यांदरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. त्यातील 299 घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. यंदा (2021) बलात्काराच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तितक्याच कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील 445 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2020 मध्ये संपूर्ण वर्षात मुंबईत बलात्काराच्या 767 घटना घडल्या होत्या.
हेही वाचा - Bhiwandi Crime : धक्कादायक! अल्पवयीन मोलकरीणवर मालकाचा जंगलात बलात्कार; आरोपी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.