मुंबई - मुंबईतील हाय प्रोफाईल हात्याकाडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची ( Indrani Mukherjee ) मुलगी विधी मुखर्जीने ( Indrani Mukherjee's daughter Vidhi Mukherjee ) आपल्या आईला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये मीठी मारली. सात वर्षानंतर पाहिल्यानंतर कुठल्याही परवानगीची वाट न पाहता सात वर्षापासून दूर असलेल्या मुलीने आईची गळभेट घेतली. विधीने कोर्ट रूममध्ये प्रवेश करताना आईला पाहिल्याबरोबर चेहऱ्यावर स्माईल करत आज आईची गळाभेट घेतले आहे.
विधी 7 वर्षानंतर भारतात - विधी 7 वर्षानंतर भारतात आली आहे. ती तिच्या आईला भेटली नाही. ती आईला किमान मिठी तरी मारू शकते का? अशी विचारणा विधीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ( Supreme Court ) केली. विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर म्हणाले की, इंद्राणीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे मी अशा विनंतीला परवानगी देऊ शकत नाही, किंवा नाकारू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले.
खन्नाही शीना बोरा हत्येप्रकरणात आरोपी - विधी तिच्या आईला केवळ मिठी मारेल. तिच्याशी काही बोलणार नाही. असे विधीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) आदेशाचे पालन करावे लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. विधी ही इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांची मुलगी ( Vidhi is the daughter of Indrani Mukherjee and Sanjeev Khanna ) आहे. पीटर मुखर्जीच्या आधी इंद्राणीचा संजीव खन्नाबरोबर विवाह झाला होता. संजीव खन्नाही शीना बोरा हत्येप्रकरणात आरोपी ( Sheena Bora murder case ) आहे.
शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये विधीचा जबाब - इंद्राणी मुखर्जीची ( Peter Mukherjee ) मुलगी विधी हिने विशेष सीबीआय न्यायालयाता काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयाने विधीला इंद्राणीबरोबर राहण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयाला ही विनंती केली. न्यायालयाने फेटाळलेल्या अर्जात विधीने म्हटले होते की, आईला 2015 मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. गेली सात वर्षे आईच्या प्रेमापासून सहवास, जिव्हाळ्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात इंद्राणीची जामिनावर सुटका करताना तिला कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क न साधण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली होती. असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने विधीचा आईबरोबर राहण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला. शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये सीबीआयने विधीचा जबाब नोंदविला आहे.
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा, शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी, पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.