ETV Bharat / city

Nitesh Rane : पीएफआयप्रमाणे रजा अकादमीवरही बंदी घाला.. नितेश राणे आक्रमक - PFI Banned in India

Nitesh Rane Demand: केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर PFI Banned in India आता याचा सर्व ठिकाणी देशभरातून स्वागत होत असताना अशाच पद्धतीची बंदी रझा अकादमीवर घालण्यात Demands To Ban On Raza Academy यावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे BJP leader Nitesh Rane यांनी केली आहे.

Nitesh Rane Demand
Nitesh Rane Demand
author img

By

Published : Sep 28, 2022, 3:14 PM IST

मुंबई : Nitesh Rane Demand: केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर PFI Banned in India आता याचा सर्व ठिकाणी देशभरातून स्वागत होत असताना अशाच पद्धतीची बंदी रझा अकादमीवर घालण्यात Demands To Ban On Raza Academy यावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे BJP leader Nitesh Rane यांनी केली आहे.

काय म्हणालेत नितेश राणे ? देशभरात दहशतवाद, आतंकवादी कारवाया करणाऱ्या पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली. या गोड बातमीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi व गृहमंत्री अमित शाह Home Minister Amit Shah यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद. पीएफआय या संघटनेचा अनेक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये समावेश असून देशातील युवकांना बिघडवण्याचं व त्यांच्याकडून देशद्रोही कृत्य करण्याचे काम ही संघटना करत होती. या संघटनेवर बंदी आणल्यामुळे देशातील युवांचे भविष्य आता उध्वस्त होणार नाही, असा संदेश मोदी सरकारने Modi Govt दिल्याचेही नितेश राणे यांनी म्हटल आहे. त्याचप्रमाणे पीएफआय प्रमाणे रझा अकादमीवर सुद्धा बंदी घालण्यात यावी अशी, मागणी ही त्यांनी केंद्र सरकार विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

नितेश राणेंची मागणी

देशातील वातावरण खिळखिळे करणे : याविषयी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की पीएफआय विषयी सातत्याने इनपुट हे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या एजन्सीला वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून भेटत होते. दहशतवादी कृत्य करून देशाला खिळखिळे करणे हे एक प्रकारचे देशद्रोही कृत्य असून दुसरीकडे सायलेंटली हळुवारपणे सुद्धा देशाला खिळखिळे करण्याचं काम हे पीएफआय च्या मार्फत केलं जात होतं. देशात राज्यात अंतर्गत वादाचा भडका कसा निर्माण होईल हे काम पीएफआय करत होती, असंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं आहे. केरळ सरकारने सर्वात अगोदर पीएफआय वर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्याने सुद्धा याबाबत केंद्र सरकारशी पाठपुरावा केला. उत्तर पूर्वेला मशिदी तोडल्याप्रकरणी मध्यंतरी फार मोठा भडका अमरावतीमध्ये उडाला होता. त्याचे पडसाद आपण सर्वांनी बघितले. वास्तविक याचा अमरावतीशी काही संबंध नव्हता. इतर देशातील त्याचबरोबर बांगलादेशचा त्याचा समावेश होता. तेच पीएफआय करत आहे. सध्या पीएफआय वर बंदी घातल्यानंतर त्यांचा फायनान्स मॉडेल काय आहे, कशा पद्धतीचे त्यांनी अकाउंट तयार केले आहेत, या सर्व गोष्टींचे पुरावे आता हाती लागतील. बंदी बाबत प्रत्येक राज्याने कारवाई करायची आहे. त्याचबरोबर पीएफआय शी संबंधित ६ संघटनांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.

प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाईल : पीएफ सायलेंट किलर असून त्यांना माहीत होतं की भारतात आर्मी, इंटेलिजन्स सतर्क झाली आहे. म्हणून एक मानवी चेहरा पुढे करायचा व त्या मानवी चेहऱ्याच्या मागून अशा पद्धतीची कृत्य पीएफआय करत होती. सीमीवर बंदी घातल्यानंतर अशा पद्धतीची कृत्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. परंतु आता एक एक गोष्टी सर्व बाहेर येत जातील. देशभरात कारवाई केलेल्या त्याचबरोबर महाराष्ट्रात कारवाई केलेल्या लोकांवर योग्य त्या कलमा अंतर्गत कारवाई होईल. ज्या पद्धतीने त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल त्या पद्धतीची त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले. तसेच पीएफआय बरोबर ज्या फ्रंटल ६ ऑर्गनायझेशन तयार झाल्या आहेत त्याचे सुद्धा धागेदोरे कुठपर्यंत आहेत ते शोधून त्यांचे अकाउंट त्यांना फंड कुठून यायचा हे सर्व तपासलं जाईल, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले.

काय म्हणाले राम कदम ? याबाबत बोलताना राम कदम म्हणाले (Ram Kadam said) की, मग कोणतीही संघटना या देशात राहून या देशाचं खायचं, प्यायचं व गुणगान मात्र आपला जो शत्रू देश आहे, त्या शत्रूचं करायचं. या देशाच्या भूमीवर पाकिस्तान जिंदाबादचे नारे द्यायचे. जो या देशाचा सच्चा भक्त आहे, तो हे कसा काय सहन करेल? आणि त्याच्या पलीकडे जाऊन इथला जो युवक आहे त्याने अतिरेकी करावांयामध्ये भाग घ्यावा म्हणून त्याची माथी भडकावून त्यांना प्रेरित करायचं, हा बदललेला भारत आहे. याबदललेल्या भारतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशद्रोही, देशविरोधी कारवाई करणाऱ्या विरोधात कारवाई तर होणारच.

पीएफआय गुन्ह्यांमध्ये सहभागी - पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले (Union Home Minister banning PFI organization) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.