ETV Bharat / city

BMC Election 2022 : मुंबई महापालिकेत ओबीसींच्या जागा वाढणार!

मुंबई महापालिकेत ओबीसींना २७ टक्के ओबीसी आरक्षण दिले जाणार आहे. पालिकेच्या प्रभागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या २३६ प्रभागानुसार ६४ प्रभाग ओबीसींसाठी राखीव ठेवले ( OBC Political Reservation Municipality ) जाणार आहेत. यामुळे ओबीसींच्या जागेत ३ ने वाढ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत ( Mumbai Municipal Corporation ) २०१७ च्या निवडणुकीत २२७ प्रभाग होते. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी २, ओबिसींसाठी ६१ तर महिलांसाठी ५० टक्के प्रभाग आरक्षित होते.

BMC Election 2022
BMC Election 2022
author img

By

Published : Jul 22, 2022, 7:48 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. मुंबईत २७ टक्के ओबीसी आरक्षण दिले जाणार आहे. पालिकेच्या प्रभागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या २३६ प्रभागानुसार ६४ प्रभाग ओबीसींसाठी राखीव ठेवले ( OBC Political Reservation Municipality ) जाणार आहेत. यामुळे ओबीसींच्या जागेत ३ ने वाढ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत २०१७ च्या निवडणुकीत २२७ प्रभाग होते. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी २, ओबीसींसाठी ६१ तर महिलांसाठी ५० टक्के प्रभाग आरक्षित होते. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायलयाने ओबीसी आरक्षण रद्द करून त्यांचा इम्पेरिकल डाटा सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे गेल्या काही वर्षात ओबीसींना आरक्षण नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बांटीया आयोग नियुक्त केला होता. या आयोगाने ओबीसींचा इम्पेरिकल डाटा राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल केले आहे.

ओबीसींच्या जागा वाढल्या : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल केल्याने मुंबई महापालिकेत २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळणार आहे. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग असताना ओबीसींना ६१ जागा राखीव होत्या. सध्या पालिकेतील २३६ प्रभाग आहेत. त्यानुसार ओबीसींना ६४ जागा राखीव असणार आहेत. ओबीसींच्या जागेत ३ प्रभागांची वाढ झाली आहे. ६४ प्रभागांपैकी ओबीसी महिलांसाठी ३२ प्रभाग आरक्षित असणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देश आल्यावर हे बदल केले जातील, असे पालिकेतील निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदासाठी भाजपा खासदाराने थोपटले दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.