मुंबई - महाराष्ट्र भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ ठरवल्यानंतर आता लोकसभेपाठोपाठ विधानसभेवर ही लक्ष केंद्रित करण्याच ठरवलं (After Lok Sabha Now BJPs Vidhan Sabha Mission) आहे. यासाठी भाजपने विधानसभा मिशन ९८ ची घोषणा (BJPs Vidhan Sabha Mission 98) केली असून याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आली असल्याची माहिती आहे.
ज्या जागा मागील दहा वर्ष जिंकता आल्या नाहीत, त्यावर लक्ष ? राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे गट व भाजप यांचे सरकार अस्तित्वात आले. आता या परिस्थितीत भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत यश काबीज करण्याचा निश्चय केला असून यासाठी, आता भाजपने मिशन विधानसभा मिशन ९८ ची घोषणा केली आहे. या ९८ जागा विधानसभेच्या अशा आहेत, की जिथे मागील दहा वर्षात भाजपला यश प्राप्त झाले नाही. म्हणून अशा जागा निवडून भाजपने येथे विजयी होण्यासाठी कंबर कसली असून त्या अनुषंगाने रणनीती आखली आहे. याची जबाबदारी भाजपने आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपवली असून पाच ते सहा मतदारसंघा मागे एक मंत्री असणार आहे. ज्याच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. शिंदे गट व भाजप यांचे एकत्रित सरकार जरी सत्तेवर असलं, तरी सुद्धा येणाऱ्या दिवसात भाजप स्वबळावर सत्ता आणण्याचा प्रयत्नात असून यासाठी भाजपने ही रणनीती आखली असल्याचं जाणकारांचे मत (BJPs Mission 98 MLA Shrikant Bharatiya) आहे.
स्वबळावर सत्ता स्थापनाचा निर्धार - यंदा लोकसभेसाठी भाजपने मिशन ४५ ची घोषणा केली असून लोकसभेसाठी अशा १६ जागा निवडल्या आहेत. जिथे त्यांना विजय मिळवता आला नव्हता, आता अशा जागांवर भाजप लक्ष केंद्रित करत असताना, विधानसभेच्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या ठिकाणी यामध्ये नांदेड, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. जेणेकरून त्यांची ताकद ही राज्यात सर्वात प्रथम क्रमांकाची असेल, या अनुषंगाने ते तयारीला लागले आहेत.
मागे २०१४ च्या निवडणुकीत भाजपला राज्यात विधानसभेच्या १२२ जागी विजय प्राप्त झाला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजप १०६ जागांवर विजयी झाला होता. परंतु आत्ता १४५ च्या पुढे विधानसभेच्या जागा जिंकून स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे भाजपने आखले असून, त्या दृष्टिकोनातून आता लोकसभेपाठोपाठ भाजपने विधानसभा मिशनची ही तयारी जोमात सुरू केली (BJPs Mission 98) आहे.