ETV Bharat / city

Nawab Malik On Up Election 2022 : पाच वर्ष भयभित राहिल्यानंतर उत्तर प्रदेशतील जनतेला परिवर्तन हवे - नबाव मलिक

author img

By

Published : Jan 14, 2022, 1:19 PM IST

उत्तर प्रदेशातील भाजपाने ( Uttar Pradesh Bjp ) अहंकारामुळे लोकांना अपमानित केले. त्यामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये नाराजी होती. म्हणूनच भाजपातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत, असे मत नवाब मलिक यांनी ( Nawab Malik On Up Election ) व्यक्त केले.

Nawab Malik
Nawab Malik

मुंबई - उत्तर प्रदेशातील भाजपात गेल्या ( Uttar Pradesh Bjp ) पाच वर्षात मोठा अहंकार निर्माण झाला होता. या अहंकारामुळे लोकांना अपमानित केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्याचमुळे भाजपातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर ( Up Minister Resigns ) पडत आहेत. हे सत्ता परिवर्तनाचे संकेत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik On Up Election ) यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, "उत्तर प्रदेशमधील जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. गेली पाच वर्ष ही जनता भयभित राहत होती. येथील भाजपात मोठा ( Uttar Pradesh Bjp ) अहंकार निर्माण झाला होता. या अहंकारामुळे लोकांना अपमानित केले जात होते. म्हणून उत्तर प्रदेश सरकार विरोधात प्रचंड ( Uttar Pradesh Bjp ) नाराजी होती. याच कारणाने भाजपातून लोक बाहेर पडत आहेत. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश भाजपात फूट पडेल. हे सत्ता परिवर्तानाचे संकेत आहे."

पंतप्रधानांकडून राज्याला सूचना

"देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक ( Pm Narendra Modi On Corona Meeting ) बोलावली होती. या बैठकीत कोरोना परिस्थितीशी आपल्या पद्धतीने राज्याने लढावे, अशी सूचना नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यात कोरोना वाढत आहे. मात्र, कालच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो का? अशी भिती नागरिकांना होती. कारण या आधी पंतप्रधानांनी थाळ्या वाजवून घेतल्या, दिवे लावून घेतले. नंतर अचानक लॉकडाऊन जाहीर केले. पण, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून लॉकडाऊन लावण्यात आलेले नाही. ही जनतेसाठी चांगली गोष्ट असल्याचेही नबाव मलिक यांनी ( Nawab Malik On Pm Corona Meeting ) यावेळी बोलताना म्हटले."

हेहा वाचा - Vitthal-Rukmini Temple : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सजावट;पहा हा खास व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.