ETV Bharat / city

प्रशासनामध्ये फेरबदल : सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या - administration of maharashtra

महामारीच्या काळात राज्याच्या प्रशासनात अंतर्गत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौरव राव यांची नियुक्ती पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली असून भूषण गगराणी यांना प्रधान सचिव नगर विकास-१ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

maharashtra administration
प्रशासनामध्ये फेरबदल: सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या
author img

By

Published : Aug 5, 2020, 4:34 PM IST

मुंबई - महामारीच्या काळात राज्याच्या प्रशासनात अंतर्गत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौरव राव यांची नियुक्ती पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली असून भूषण गगराणी यांना प्रधान सचिव नगर विकास-१ ची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशासनामध्ये बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने दोन सनदी अधिकाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे असंसर्गीय आजारासंबंधी काम करण्याबाबत प्रवीण परदेशी यांना महिनाभरापूर्वी ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर परदेशी यांना परवानगी देऊन कार्यमुक्त करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार केंद्राच्या अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटने (एसीसी) परदेशी यांचा हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर परदेशी यांना कार्यमुक्त करण्यात आले.

प्रवीण परदेशी सध्या राज्याच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. याआधी ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता परदेशी यांच्या जागेवर सनदी अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-१ या पदावर करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमध्ये अचानकपणे परदेशी यांची महापालिकेतून बदली करण्यात आली होती . त्यामुळे ते नाराज होते. कार्यक्षम अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी यांचा नावलौकीक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.

किल्लारी भूकंपावेळी परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्या काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेतून परदेशी यांची बदली झाली. सौरभ राव हे पुणे विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.