ETV Bharat / city

आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिले तसेच बहुजनांचे सुद्धा पालकत्व स्वीकारा - गोपीचंद पडळकर - महाविकास आघाडी लेटेस्ट

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.

गोपिचंद पडळकर
गोपिचंद पडळकर
author img

By

Published : May 9, 2021, 2:30 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही केल्या मागण्या

'महाविकास आघाडी सरकारच पापी ठरेल'

'मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. पण उर्वरित समाजाचं काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचे काय करायचे? इतर सर्व मागासवर्गीय, एनटी (NT), एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील 365 युवकांना अजून नियुक्ती नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच पापी ठरेल', असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांचे ट्विट
गोपीचंद पडळकर यांचे ट्विट

हेही वाचा - 'मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच, माहिती न घेता भाजपची भ्रष्टाचाराची बोंब'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.