मुंबई - राजकारणात वातावरण बदल होत आहे. तर काही विषाणुही येत आहेत. मात्र, आम्ही राज्याचे आणि देशाच वातावरण प्रदूषित होणार नाही, यासाठी काम करू असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे प्रकरणावरून लगावला आहे. यावेळी मुंबई आणि राज्यातील वातावरण बदलाबाबत आराखडा तयार करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएकडून वातावरण बदलाबाबत आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी वेबसाईटचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुंबई महापालिकेने घेतलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा-ईडीकडून एकनाथ खडसेंची नेमकी कोणती मालमत्ता जप्त? महसूल विभागही अनभिज्ञ? चर्चांना उधाण
वातावरण प्रदुषणमुक्त राहावे-
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे, देशाचे, जगाचे वातावरण अप्रदुषीत राहावे असे आमचे प्रयत्न आहेत. नारायण राणे यांचे नाव न घेता आमच्यासाठी हा विषय संपला आहे. वातावरणात बदल होत आहे. त्यासाठी मुंबईत क्लायमेट अॅक्शन प्लान तयार होत आहे.नोव्हेंबरपर्यंत सूचना घेऊन हा कृती आराखडा तयार होईल. मुंबईप्रमाणेच राज्याचा क्लायमेट अॅक्शन प्लान तयार करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा भाग सुरु झाला आहे. एमएमआरडीए आणि बीएमसी मिळून हा कृतीआराखडा तयार होत आहे. बीएमसीने आता इलेक्ट्रीक वाहन घ्यायला सुरुवात केली आहे. २०२५ पर्यंत राज्यात मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर असतील असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-नाशिक भाजप कार्यालयावर हल्ला करणारे संशयित संजय राऊत यांच्यासोबत; अटक करण्याची मागणी
सरकारचा हवामान बदलावर कृती आराखडा -
मुंबईत सातत्याने वातावरण बदलाचे परिणाम बघायला मिळत आहेत. त्यासाठी मुंबईतील वातावरण बदलाचा कृती आराखडा मुंबई महापालिकेकडून तयार केला जाणार आहे. या कृती आराखड्याबाबत नागरिकांच्या तसेत तज्ज्ञांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती सूचना नोंदविण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. त्याचा शुभारंभ आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. हा कृती आराखडा डिसेंबर पूर्ण होणार आहे. तसेच, राज्य सरकारच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणानुसार महापालिकेने वापरासाठी नवी विद्युत वाहने खरेदी केली आहेत. त्याचाही शुभारंभ आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा-कोकणातल्या आंबा-काजू बागायतदारांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही - नारायण राणे
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनीही नुकताच राणेंना लगावला होता टोला
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की कोरोना अद्याप गेलेला नाही. अशातच जुने व्हायरस पुन्हा आले आहेत. कारण नसताना साईड इफेक्ट आणत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत नारायण राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात शिवसेना आणि नारायण राणे असा संघर्ष निर्माण झाला आहे.