ETV Bharat / city

वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे - Driving tourism development

पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कल मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बोलताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पर्यटकांनी वारसा स्थळांना भेट द्यावी आणि त्यांना त्या स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Oct 21, 2021, 10:54 PM IST

मुंबई - पर्यटकांनी वारसा स्थळांना भेट द्यावी आणि त्यांना त्या स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. राज्याला आणि देशाला याचा निश्चितच लाभ होईल. पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व संस्थेच्या समन्वयाने यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.

पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कल मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे डॉ मिलन चौले, डॉ. राजेंद्र यादव आदी यावेळी उपस्थित होते.

वारसा स्थळांमध्ये प्रवेश मिळावा

प्रत्येक शहराला ऐतिहासिक महत्त्व असते. त्याअनुषंगाने तेथील वारसा स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना होणे आवश्यक आहे. यासाठी ४ ते ५ वारसा स्थळांची निश्चिती करावी तसेच तेथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. ज्या बाबींसाठी परवानग्या आवश्यक आहेत, त्या मिळविण्यासाठी एकत्रित पाठपुरावा करावा. राज्य शासनाने मान्यता दिलेल्या गाईड्स ना वारसा स्थळांच्या आत प्रवेश मिळावा. गाईड्सचे दर निश्चित करावेत. सध्या दुरवस्थेत असलेल्या सुविधा अद्ययावत कराव्यात आदी बाबींवर चर्चा करून आवश्यकतेनुसार संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्याची सूचना मंत्री ठाकरे यांनी केली.

हेही वाचा - Exclusive Interview :... म्हणून मला लक्ष केले जात आहे - समीर वानखेडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.