ETV Bharat / city

Aditya Thackeray Criticized BJP : मी फालतू विषयांवर बोलत नाही - आदित्य ठाकरे - Lilavati Hopsital

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याकडून सातत्याने शिवसेनेला आव्हान दिले जात आहे. मात्र फालतू विषयावर आम्ही बोलत नाही. तसं करत बसलो तर चांगली कामे मागे पडतील, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राणा दाम्पत्याला लगावला.

Aditya Thackeray
Aditya Thackeray
author img

By

Published : May 9, 2022, 4:04 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याकडून सातत्याने शिवसेनेला आव्हान दिले जात आहे. मात्र फालतू विषयावर आम्ही बोलत नाही. तसं करत बसलो तर चांगली कामे मागे पडतील, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राणा दाम्पत्याला लगावला. नानावटी रुग्णालयातील भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जनसेवेच्या कामावर बोलू
खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hopsital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देखील दिले होते. राणा त्यांच्याकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. तसेच दिल्लीला तक्रार करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याकडून दिला जातो आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यावर भाष्य करताना, आम्ही फालतू विषयांवर बोलत नाही. चांगली काम आपण बघत आहोत. मागच्या आठवड्यात कूपर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. आज नानावटी रुग्णालय आहे. जनसेवेची जी महत्त्वाचे काम आहेत, त्यावर आपण बोलू, असे मंत्री ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - 'असली आ रहा है, नकली से सावधान'; अयोध्येत शिवसेनेची बॅनरबाजी

600 बेड वाढणार
नानावटी रुग्णालयाच्या फेस टू चे भूमिपूजन झालेला आहे. मुंबईकरांसाठी हे महत्वाचे हॉस्पिटल आहे. सध्या स्थिती ३०० बेड असून साडे सहाशे बेड वाढणार आहे. १८० मोफत भेटची सुविधा होईल. एक नवीन हॉस्पिटल झाल्यासारखाच असेल. त्यामुळे सहाशे बेडची जी आवश्यकता आहे, ती यामुळे पूर्ण होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

एक विंडो उपक्रम राबवणार
एनआयएने मुंबईत केलेल्या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करणे टाळले. आजचे काम चांगले झाले आहे. आरोग्य व्यवस्था अधिक समक्ष करण्यावर भर देऊ. यासाठी राज्यात येणाऱ्या रुग्णालयांना परवानग्या कशा मिळतील, एक विंडो कार्यक्रम राबवता येईल का.? याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राजकारणात चांगली कामं मागे पडतात
आयोध्यामध्ये दर्शनासाठी जात आहोत. असली-नकली असं काही नाही. फक्त दर्शनासाठी जातोय कारण तेथील संघर्ष संपला आहे, असे मंत्री तिथे ठाकरे आणि सांगताना असली-नकली पेक्षा राजकारणामध्ये चांगली कामे मागे राहतात. त्यामुळे चांगल्या कामावर बोलू असा चिमटा मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला काढला.
हेही वाचा - Ayodhya Tour : रामभूमीवरुन राजकारण; मतांची पोळी भाजण्यासाठीच राजकीय नेत्यांची अयोध्यावारी, पहा कोणते नेते जाणार दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.