मुंबई - केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी आज मुंबई दौरा ( Amit Shah Mumbai visit ) केला. यावेळी त्यांनी शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती Shiv Sena broke the alliance तोडली, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा असे वक्तव्य केले आहे. यावर जो काही कट रचला होता तो आता समोर येत आहे तो समोर येत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
तो कट समोर येत आहे अमित शाह यांनी केलेल्या आरोपावर आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की अमित शाह यांच्या या विधानावर मी काहीच बोलू शकत नाही. जो काही कट रचला होता तो आता समोर येत आहे. अमित शहा काय काय बोलले त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. पण जे चाळीस लोक गेले आहेत, त्यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारा. मी सध्या सर्वत्र गणपतीचे दर्शन घेत आहे. प्रेम आणि आशीर्वाद लोकांचे घेऊन फिरत आहे. दोन जागांसाठी युती तुटली या त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर काय बोलायचं असे आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray criticized Amit Shah ) म्हणाले.
आसमानातून जमीन दाखविली पाहिजे, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया ( Kishori Pednekar slammed BJP ) शिवसेनेनं १५० चा नारा यापूर्वीच दिला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं जर हाच नारा दिला असेल तर त्यांच्या नाऱ्यात आणि वास्तवात जमिन-आस्मानाचे अंतर आहे. अमित शाहांची अवस्था गजनी सारखी का झाली? अडीच वर्षांनंतर दोन जागांसाठी युती तोडली हा साक्षात्कार का झाला? स्थानिक, प्रादेशिक पक्ष संपवायचे हा अजेंडा सर्वांना कळला आहे. कोण कोणाला धोका देतंय, खोके देतंय, कोण कोणाचे बोके पळवतंय हे सगळं लोकांना दिसतंय. आम्ही जमिनीवरच आहोत अजुन आम्हांला काय जमिन दाखवताय. भाजपाला आसमानातून जमिन दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, याकरता गट तट तोडायचे काम भाजप करत आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईकरता मिशन १५० नारा दिला आहे. त्यांना कॉपी कायचा असेल तर करु देत अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.
स्वबळावर का निवडणुका लढवत नाही, मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया ( Shiv Sena spokesperson Manisha Kayande ) नैसर्गिक युतीची वार्ता करतात त्यांनी पीडीपीबरोबर सरकार बनविले. ही कोणती नैसर्गिक युती होती. जे नितेश कुमार म्हणतात आरएसएसला बंद करा. त्यांच्याबरोबर भाजपने युती केली. शिवसेनेने कोणाबरोबर युती केली तर ती अनैसर्गिक?. धडा कोण कोणाला शिकवेल बघूया आपण. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी अशी भाषा बोलणे चुकीच आहे. मुंबई महापालिकेत त्यांना टार्गेट पूर्ण करायचा आहे. ते करण्यासाठी त्यांना सर्वांपुढे का जावे लागते, स्वबळावर का निवडणुका लढवित नाही. 2014 मध्ये युती कोणी तोडली असे प्रश्न विचारत युती त्यांनी तोडली होती, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले आमित शाह अमित शाह यांनी आज भाजपा मंत्री आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या भेटी दरम्यान अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती तोडली असं सांगत शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली असल्यासही ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेची अवस्था आता खयाली पुलावाप्रमाणे (ShivSena Condition Is like Khyali Pulao) झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं असून आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही तर त्यांची वाहतात त्यांनी स्वतःच लावली आहे असेही ते म्हणाले आहेत.