ETV Bharat / city

आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली डेलकर कुटुंबीयांची भेट; मोहन डेलकरांना वाहिली आदरांजली - दादरा नगर हवेली

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी एक वर्षापूर्वी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ परिसरात साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोहन डेलकरांना वाहिली आदरांजली
मोहन डेलकरांना वाहिली आदरांजली
author img

By

Published : Feb 23, 2022, 7:02 AM IST

दादरा नगर हवेली - दादरा नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांचे एक वर्षापूर्वी २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरा नगर हवेली येथे महाराष्ट्राचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी डेलकर यांना आदरांजली वाहिली.

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी एक वर्षापूर्वी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ परिसरात साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दादरा नगर हवेली येथील डेलकर यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे नमूद केले. तसेच हे कुटुंबाशी कौटुंबिक नाते आहे, राजनैतिक संबंध नाही. डेलकर आणि ठाकरे घराणे ही दोन कुटुंबे आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.