मुंबई- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आता समोर आली आहे. खोटे आरोप व ट्विटरबाजी करुन काही होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दिले आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली, की आरोप कोर्टात केलेले नाहीत. ट्विटर कोर्ट आहे का?. माझा नवरा खोटारडा नाही. रोज काय स्पष्टीकरण द्यायचे? असे सवाल तिने उपस्थित केले आहेत. सर्व दावे खोटे आहेत. त्यांच्याकडे (नवाब मलिक) असे काही पुरावे असतील तर ते (नवाब मलिक) न्यायालयात सादर करतील तरच त्यांच्यावर न्याय होईल. ट्विटरवर कोणीही काहीही लिहू शकतो. जे खरे ठरणार नाही.
हेही वाचा-मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू, क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना प्रत्यूत्तर
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर फोन टॅप केल्याच्या आरोपावर क्रांती रेडकरने खंडन केले. क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावले. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, असाही दावा केला.
हेही वाचा-कोण आहेत दबंग अधिकारी समीर वानखेडे? जाणून घ्या ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना समीर यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर आपण व समीर दोघेही जन्मतः हिंदू असल्याचा खुलासा केला. क्रांती यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, '' मी आणि माझा नवरा समीर दोघेही जन्मतः हिंदू आहोत. आम्ही कोणतेही धर्मांतर केलेले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू होते आणि माझ्या मुस्लीम असलेल्या सासूंशी विवाह केला होता, ज्या आता हयात नाहीत. समीरचे अगोदरचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार झाला होता आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार झालाय.''
हेही वाचा- ड्रग्स पार्टीवर कारवाई करणारे समीर वानखेडे कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी खास माहिती
समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
समीर वानखेडे हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी (2017)साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला. त्यांना जुळी मुले आहेत. या कारवाईनंतर चर्चेत आलेले पती समीर वानखेडे यांच्याबद्दल क्रांतीने त्यांचे कौतूक केले आहे. ‘एक पत्नी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. ते फार मेहनती आहेत. हे प्रकरण बॉलिवूडमधील असल्याने त्याची जास्त चर्चा आहे. मात्र, त्यांनी या अगोदरही असे अनेक प्रकरणं हाताळली आहेत अस क्रांती म्हणाली आहे.