ETV Bharat / city

. . अखेर सोनू सूद मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट

author img

By

Published : Jun 7, 2020, 11:49 PM IST

Updated : Jun 8, 2020, 4:16 AM IST

संचारबंदीच्या काळात कामगारांसाठी देवदूत ठरलेला सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या कामाबाबतची माहिती दिली.

Mumbai
अभिनेता सोनू सूद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट

मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.

  • Mumbai: Actor Sonu Sood met Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray at the latter's residence Matoshree. Uddhav Thackeray's son & State Minister Aaditya Thackeray was also present. pic.twitter.com/Dd6PDWFnb3

    — ANI (@ANI) June 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनू सूद पालकमंत्री मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत मातोश्रीवर दाखल झाला. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परतल्यानंतर सोनू सूदने शेवटचा कामगार घरी पोहोचवणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही त्याने माध्यम प्रतिनिधींना सांगितले. काश्मीर ते कन्याकुमारी असा सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपल्या कामात मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

सोनू सूदवरुन भाजप शिवसेनेत रंगला 'सामना'

  • अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला..
    मातोश्रीवर पोहोचले
    जय महाराष्ट्र

    — Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली. त्यामुळे सोनू सूदला परप्रांतीय कामगार देवदूत मानायला लागले. मात्र त्यावरुन राजकारण्यांचा चांगलाच 'सामना' रंगला. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून सोनूवर चांगलीच आगपाखड केली. सोनू सूदला पुढे करुन काही जण ठाकरे सरकराला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांनी सोनू सूदला दत्तक घेतल्याचा घणाघात राऊत यांनी नाव न घेता भाजपवर केला. परप्रांतीयांना घरी सोडण्यासाठी सोनूकडे पैसे येतात कुठून असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे चांगलाच सामना रंगला.

भाजपचाही पलटवार. . . . .

खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर पलटवार केला. आशिष शेलार यांनी सोनू सूद कोणत्या विचारधारेशी जोडलेला आहे, त्याच्याशी आमचे काही देणे-घेणे नाही. मात्र तो मुंबईत अडकलेल्या कामगारांना घरी सोडण्याचे चांगले काम करतो. त्याच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हायला हवे, मात्र त्याच्यावर टीका करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर राम कदम यांनीही यावेळी राऊत यांच्यावर आगपाखड केली.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भरला वादात 'रंग'

  • Actor Sonu Sood has done good work by sending a lot of migrant workers to their homes. I did not hear what Sanjay Raut sahab said. We will appreciate whoever takes such good initiatives, be it Sonu Sood or anyone else: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/VVuEhG3LDt

शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनू सूदने चांगले काम केले आहे. संजय राऊत यांनी सोनूबाबत काय वक्तव्य केले त्याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र सोनू चांगले काम करत आहे. तोच नव्हे, तर जे कोणी चांगले काम करेल त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे असेही देशमुख म्हणाले. तर काँग्रसनेते संजय निरुपम यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Last Updated : Jun 8, 2020, 4:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.