ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case : पुराव्या अभावी तक्रार नाही; बादशाहचा मुलगा निर्दोष - shahrukh khan son aryan khan clean chit by ncb

ड्रग्ज केस प्रकरणी ( Aryan Khan Drug Case ) बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा ( Actor Shahrukh Khan ) मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लीनचीट दिली ( Aryan Khan Clean Chit By NCB ) आहे.

Aryan Khan
Aryan Khan
author img

By

Published : May 27, 2022, 3:19 PM IST

Updated : May 27, 2022, 3:38 PM IST

मुंबई - ड्रग्ज केस प्रकरणी ( Aryan Khan Drug Case ) बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा ( Actor Shahrukh Khan ) मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लीनचीट दिली ( Aryan Khan Clean Chit By NCB ) आहे. मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खानसह अन्य सहा आरोपींनी क्लीनचीट देण्यात आली आहे. आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळून आले नाही, असे एनसीबीकडून न्यायालयात सांगण्यात आले.

आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा या सहा आरोपीबद्दल एनसीबीला कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे या ड्रग्ज केस प्रकरणातून त्यांचा निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोपपत्र दाखल - एनसीबीने 6000 पानांचे आरोपपत्र आज ( 27 मे ) मुंबई सत्र न्यायालयात सादर केले. 10 खंडाचे हे आरोपपत्र आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. या प्रकरणात तपास विशेष एनसीबी एसआयटी करते आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस न्यायालयाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दत वाढवून दिली होती.

पुराव्याअभावी तक्रार नाही - एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग याबाबत म्हणाले की, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अंमली पदार्थ आढळून आले. 14 जणांविरुद्ध एनडीपीस कायद्याच्या विविधा कलमांर्गत तक्रार दाखल करण्यात आली. अन्य सहा जणांविरोधात पुराव्यअभावी तक्रार दाखल केली जाणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण? - 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केले होते. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, अशी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र, कारवाईदरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एनसीबीचे जवळपास 22 अधिकारी हे प्रवासी बनून क्रूजवर गेले होते. त्यावेळी क्रूजवर जवळपास 1800 लोक होते. दरम्यान, या प्रकरणात समीर वानखेडेंवर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना चौकशीतून बाजूला करण्यात आले होते.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांची वोट बँक ते शरद पवारांचे राजकारण . . . वाचा भाजप प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated : May 27, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.