मुंबई - एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याबद्दल "मुलगी झाली हो" या मालिकेतून आपल्याला काढण्यात आले असल्याचा आरोप अभिनेते किरण माने ( Actor Kiran Mane allegation ) यांनी केला आहे. अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या समर्थानात अनेक जण उभे राहिले आहेत. तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलण्यासाठी किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ( Actor Kiran Mane met Sharad Pawar ) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. जवळपास दीड तास शरद पवार यांनी अभिनेते किरण माने यांच्याशी चर्चा केली.
" मुलगी झाली हो" या मालिकेतून आपल्या काढल्या नंतर आपली बाजू आपण शरद पवार यांच्या समोर मांडली असल्याचं भेट घेतल्यानंतर किरण माने यांनी सांगितले. तसेच आपल्या विरोधात दूरचित्रवाणी ने केलेल्या कारवाईबाबत भारतीय जनता पक्ष्यांच्या काही नेत्यांशी देखील आपण भेटून बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार ( Atul Londhe over constitutional rights ) आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
हेही वाचा - सांस्कृतिक दहशतवादाचा बळी, किरण माने!
त्यांच्या पोटावर पाय देणार का?
पुरोगामी महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा ( Atul Londhe over MH progressive tradition ) आहे. यापूर्वीही विविध कलाकारांनी राजकीय वक्तव्ये केली आहेत. सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. पण म्हणून काही त्यांना चित्रपट किंवा मालिकेतून काढले नाही. किरण माने यांनी व्यक्त केलेल्या मतांशी तुम्ही सहमत नाही. म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देणार का? आरएसएस विचाराची ही दडपशाही महाराष्ट्रात चालणार नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा विभाजनवादी विचारांना थारा नाही.
हेही वाचा - Flyovers closed in Nagpur : मांजाची धास्ती! 'या' शहरातील सर्व उड्डाणपूल मकर संक्रातीच्या दिवशी बंद
काय म्हणाले किरण माने?
एक पोस्टमुळे त्यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावर किरण माने यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत खुलासा केला की, "मी माझ्या कामात कोणतीही चुक नाही केली. मी वेळेवर शुटिंगला हजर रहायचो. कोणतंही गैरवर्तन माझ्याकडून सेटवर झालेलं नाही. नेहमीप्रमाणेच मी जीवतोडून माझ्या भुमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला काम थांबविण्यासाठी सांगण्यात आलं. का तर माझ्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे काही ठराविक वर्गाची मनं दुखावली गेली आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar On Lockdown : "... तर लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता", अजित पवारांचा इशारा