मुंबई/ पुणे - बॉलिवूडमधील टार्जन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात ( Hemant Birje Car Accident ) झाला. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर त्यांची कार दुभाजकावर ( Mumbai Pune Highway birje Car Accident ) आदळली. हेमंत बीरजे यांनी सर्दी झाल्याने गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे त्यांना डुलकी लागली आणि मोटारीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला, अशी माहिती पोलीस कर्मचारी विठ्ठल काळे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत बिर्जे हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. उर्से टोलनाका जवळ येताच त्यांना डुलकी लागली आणि मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटार थेट डिव्हाडरला धडकली. यामध्ये बिर्जे, पत्नी आणि मुलगी जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी काळे, अतुल भोसले, परदेशी आणि ठाकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टार्जन बनून मन जिंकले
55 वर्षीय हेमंत बिर्जे यांनी किमी काटकरसोबत डेब्यू केला होता. हेमंत मुंबईत ( Actor Hemant Birje ) सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे हे कदाचित फार कमी लोकांना माहित असेल. एके दिवशी दिग्दर्शक बब्बर सुभाषची त्याच्यावर नजर पडली. खरे तर सुभाषला त्यांच्या चित्रपटात असा नायक शोधत होता, मग तो दिसायला मजबूत असावा आणि लाजराही. त्याच्या चित्रपटाच्या नायकासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दिग्दर्शकाने हेमंतमध्ये पाहिले. त्याने चित्रपटाची ऑफर दिली आणि हेमंतने घाईघाईने होकार दिला.
हेही वाचा - Lata Mangeshkar Covid Positive : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर;कुटुंबाने दिली माहिती