मुंबई- बिग बॉसचा फेम अभिनेता अरमान कोहली हा ड्रग्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत ( Actor Arman Kohli In MCR ) आहे. अंमली पदार्था बाळगणे आणि सेवन केल्याप्रकरणी NCB ने अटक केलेल्या ( Arman Kohli Arrested In Drugs Case ) अभिनेता अरमान कोहलीचा मुंबईतील विशेष NDPS न्यायालयाने गुरुवारी जामीन फेटाळला ( Arman Kohli Bail Rejected ) आहे. यासंदर्भात आज सविस्तर निकाल आला आहे.
ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन : अरमान कोहलीने अलीकडेच त्याच्या आजारी पालकांना भेटण्यासाठी 14 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. त्यानंतर दोन दिवसांचा जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. कोहलीचा नियमित जामीन याचिका विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीही फेटाळल्या आहेत. अभिनेता स्व. सुशांत सिंह राजपूत आत्महत्यानंतर मुंबईतील अनेक ड्रग्स पेडलारच्या विरोधात NCB ने कारवाई सुरू केली होती. या कारवाईत अटक केलेल्या ड्रग्स पेडलरचे कनेक्शन अभिनेता अरमान कोहली सोबत तपासात समोर आल्यानंतर अरमान कोहलीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स पेडलरवर कारवाई केली होती. त्यानंतर त्याला NCB ने अटक केल्यापासून सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
अरमानकडे सापडले अमेरिकन कोकेन : NCBने अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे अमेरिकन कोकेन सापडले. महत्त्वाचे म्हणजे हे अमेरिकन कोकेन विशेष आणि महागड असते. त्यामुळे हे अरमानकडे आले कसे याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे? हे ड्रग्स कसे आणले जाते? याचा तपास केला जाणार आहे. दम्यान 2018 मध्ये अरमानला उत्पादन शुल्क विभागाने स्कॉच व्हिस्कीच्या 41 बाटल्या बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. कायदा दारूच्या 12 बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी देतो. परंतु अरमानकडे 41 पेक्षा जास्त बाटल्या होत्या आणि त्यापैकी बहुतेक विदेशी ब्रँडच्या होत्या. मैत्रिणीला मारहाण केल्याबद्दलही चर्चेत राहिलेला अरमानला अटकही झाली होती.
कोण आहे अरमान कोहली? : अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. अरमान कोहलीची बॉलिवूड कारकीर्द हिट ठरली नाही. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते. विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.
हेही वाचा : ड्रग्ज प्रकरण : अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात