ETV Bharat / city

Mumbai Congress - बैलगाडीसह कार्यकर्तेही कोसळले, मुंबईत काँग्रेस आंदोलनातील प्रकार - Activists along with bullock carts also collapsed news

केंद्र सरकारने इंधन दरवाढसह गॅसचे भावही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. ही भाववाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती असतना हाताला काम नाही. त्यामध्ये ही दरवाढ होत आहे. अशा या दुहेरी संकटात नागरिक अडकला आहे. या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर दरवाढ कमी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. ते मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनात बोलत होते.

इंधन दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jul 10, 2021, 3:53 PM IST

मुंबई - वाढत्या इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आज दुपारी अंटोप हिल भरणी नाका या ठिकाणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाडीत गॅस सिलेंडर घेऊन अनेक कार्यकर्ते उभे राहिले होते. बैलगाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उभे राहिल्याने बैलगाडीच मोडली. त्यामुळे भाई जगतापांसह सर्वच कार्यकर्ते खाली कोसळले. यावेळी कुणाला काही जखम झाली नाही. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चागलाच हशा पिकला होता.

बैलगाडीसह कार्यकर्तेही कोसळले, मुंबईत काँग्रेस आंदोलनातील प्रकार

'नागरिक दुहेरी संकटात अडकलेत'

केंद्र सरकारने इंधन दरवाढसह गॅसचे भावही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. या भाववाढीमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती असतना हाताला काम नाही. त्यामध्ये ही दरवाढ होत आहे. अशा या दुहेरी संकटात नागरिक अडकला आहे. या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर दरवाढ कमी करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे.

राज्यभरात 10 दिवसांचे आंदोलन

काँग्रेसने महागाई विरोधात १० दिवसांचे आंदोलन पुकारले आहे. ९ जुलैपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये महिला काँग्रेसनेही राज्यभर चूल मांडून आंदोलन केले आहे. संपूर्ण राज्यभर काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकार मागील 7 वर्षांत देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. 70 वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु, मोदी सरकारने 70 वर्षातील हे वैभव अवघ्या 7 वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. महागाई, इंधन दरवाढ, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी यांच्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारमधील मंत्री बदलून काही उपयोग होणार नाही, असा टोलाही काँग्रेसने भाजपला लगावला आहे.

राष्ट्रवादीचेही जेसीबीद्वारे आंदोलन

एकीकडे काँग्रेस इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढीविरोधात आक्रमक झालेली दिसते. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ही ती आक्रमक झाली आहे. आज कुर्ला येथे भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. जेसीबीला गॅस सिलेंडर बांधून या भाववाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार मिलींद कांबळे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, बापूसाहेब भुजबळ, रविंद्र पवारसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.