ETV Bharat / city

Jayant Patil On Central Investigation Agency : केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई संशयास्पद - जयंत पाटील - jayant patil On Central Investigation Agency

मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. त्यावर भाजपाच्या नेत्यांकडून कारवाईपूर्वी भाकीत होत असल्याने ती संशायस्पद वाटते, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले ( Jayant Patil On Central Investigation Agency ) आहे.

Jayant Patil
Jayant Patil
author img

By

Published : Mar 12, 2022, 5:08 PM IST

मुंबई - राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई करत आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांकडून कारवाईपूर्वीच भाकीत होत असल्याने ती संशयास्पद वाटते, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil On Central Investigation Agency ) यांनी आज ( शनिवार ) केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणात केंद्र सरकारने तक्रार दाखल केली आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी या संदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले. तेव्हा पाटील यांनी सांगितले की, 'केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करतात हे ठीक आहे. केंद्रातील सत्तारूढ पक्षाचे सदस्य त्यात सहभागी कारवाई होण्यापूर्वी भाकीत करत आहेत. यंत्रणांची कारवाई योग्य की अयोग्य याकडे बघण्याचा संशय बळावतो आहे.'

जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना

'अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प समतोल साधणारा आहे. जलसंपदा विभागातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी विशेष तरतूद केल्या आहेत. कित्येक वर्षे रखडलेला गोसीखुर्द प्रकल्पाला पहिल्यांदाच भरीव निधी दिला आहे. परंतु, कोणीतरी पूर्वदूषित गृह मनात ठेवून वागत आहे,' असा अप्रत्यक्ष चिमटा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता काढला.

'यशवंतरावांच्या विचाराने महाराष्ट्र चालला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घालण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरुवात केली. त्या दिशेने आज महाराष्ट्र चालला आहे. तसेच, राज्य यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या ध्येयधोरण, तत्ववाणी आणि विचाराने चालला आहे. विकासाची योग्य दिशा त्यांनी दाखवली आहे,' असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Police Transfer Corruption Case : देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.