LIVE UPDATES :
03.15 - अभिनेत्री कंगना रणौत विमानतळावरून खार येथील घरी पोहोचली. काही वेळानंतर पाली हिल येथे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
02.45 -'महापालिकेने दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे आणि त्यांनी अवैधपणे इमारतीच्या परिसरात प्रवेश केला. आवारात कोणतेही काम चालू नव्हते,' असे कंगना रणौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
02.30 - अभिनेत्री कंगना रणौत विमानाने मुंबईत दाखल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांची गर्दी.
01.50 - मुंबई उच्च न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने महापालिकेला कंगनाच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले.
01:00 - कंगनाच्या इमारतीवरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कारवाईविरोधात तिच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
12:40 - कंगनाचे वकील तोडक कारवाई स्थळी उपस्थित.
12:30 - मुंबई : कंगनाच्या पाली हिल येथील इमारतीवर महापालिकेची कारवाई सुरूच.. इमारतीत अनेक अनधिकृत बांधकामे असल्याची पालिकेने दिली होती नोटीस.
12:00 - मुंबई : कंगना रणौतच्या वकिलाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) कंगनाच्या मालमत्तेवर करण्यात येत असलेल्या तोडक मोहिमेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज दुपारी 12:30 वाजता यावर सुनावणी होणार आहे.
11:30 - मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी सिनेअभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर तोडक कारवाई सुरू केली.
11:15 मोहाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौत. लवकरच ती मुंबईला रवाना होणार आहे.
11:00 - खासदार संजय राऊत 'सामना'च्या कार्यालयात पोहोचले , काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष.
10:10 अभिनेत्री कंगना रणौत मोहाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली, ती लवकरच मुंबईला रवाना होणार आहे.
09:30 हिमाचल प्रदेशः अभिनेत्री कंगना रणौतने आज हमीरपूर जिल्ह्यातील कोठी परिसरातील एका मंदिरात प्रार्थना केली. ती मंडी जिल्ह्यातून चंदीगडला जात आहे. चंदीगडहून ती मुंबईला रवाना होणार आहे.
08:30 हिमाचल प्रदेशः अभिनेत्री कंगना रणौत चंडीगडसाठी मंडी जिल्ह्यातील भानवला गावातून रवाना झाली. चंदीगडहून ती मुंबईला रवाना होणार आहे.