ETV Bharat / city

Sakinaka Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी दोषी; 2 जून रोजी शिक्षा सुनावणार - Sakinaka Rape Case latest Update

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील बहुचर्चित साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणातील ( Sakinaka rape case ) आरोपीला आज दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले ( Dindoshi Sessions Court ) आहे. आरोपीला 2 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज (सोमवार) झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे

Sakinaka Rape Case accused sentenced
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी दोषी
author img

By

Published : May 30, 2022, 7:45 PM IST

मुंबई - मुंबईतील बहुचर्चित साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणातील ( Sakinaka rape case ) आरोपीला आज दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले ( Dindoshi Sessions Court ) आहे. आरोपीला 2 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज (सोमवार) झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पोलिसांनी केले होते दोषारोप पत्र दाखल - साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करत तिची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणची गंभीर दखल ही राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतल्यानंतर हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांनीही या प्रकरणात तातडीने दोषारोप पत्र दाखल केले होते.

पीडित महिलेल्या दिली होती 20 लाखांची मदत - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. महिलेवर बलात्कार करून आरोपींचे तिथून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून आरोपीला पकडण्यात आले होते. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांवर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक आरोप देखील करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोग का पासून या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या होत्या. तसेच राज्य सरकारवर टीका देखील करण्यात आली होती. राज्य सरकारकडून पीडित महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींना 20 लाखांची मदत देण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय? मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही 9 सप्टेंबरला मध्यरात्री घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Mumbai Bomb Blast Case : मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

हेही वाचा - नांदेडात खळबळ : माजी मंत्र्यांच्या घरात घुसला बंदूकधारी तरुण, केली खंडणीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.