ETV Bharat / city

Bulli Bai App Case : बुलीबाई अ‍ॅप प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर 20 जानेवारीला निकाल

बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील ( Bulli Bai App Case ) आरोपी यांच्या जामीन अर्जावर सोमवारी ( Bulli Bai App Case Accused Bail Application Hearing Today ) सुनावणी झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला. त्यामुळे आज पुन्हा आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निकाल 20 जानेवारी जाहीर करणार असल्याचे म्हटले.

Bulli Bai App Case
Bulli Bai App Case
author img

By

Published : Jan 18, 2022, 3:16 PM IST

Updated : Jan 18, 2022, 4:53 PM IST

मुंबई - बुलीबाई अ‍ॅप प्रकरणातील ( Bulli Bai App Case ) आरोपी यांच्या जामीन अर्जावर सोमवारी ( Bulli Bai App Case Accused Bail Hearing ) सुनावणी झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला. सुल्ली डील याॲपमध्ये देखील हे आरोपी सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा बांद्रा कोर्टात मुंबई पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळे आज पुन्हा आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखीव ठेवत, यासंदर्भातील निकाल 20 जानेवारी रोजी सुनावणार असल्याचे म्हटले आहे.

3 आरोपींना अटक -

बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायाशी निगडित नावे वापरली होती. समाजातील एकात्मता आणि सलोखा भंग व्हावा, हा या आरोपींचा उद्देश असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. मुस्लीम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अ‍ॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुल्लीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या जामीन अर्जाला पोलिसांचा विरोध -

या प्रकरणातील आरोपींना जामीन अर्जाला मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास तपासावर परिणाम होईल, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. तिनही आरोपी सोशल मीडियावर विशिष्ट प्रकारच्या पोस्ट शेअर करत असतात. यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याच्या पोस्ट असतात, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायासंबंधित नावे वापरली आणि जाणीवपूर्वक दोन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बुलीबाई अ‍ॅप निर्मितीमध्ये आरोपींचा सक्रीय सहभागी आहे. याबाबत अधिक तपास आवश्यक असून त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी मागणी करण्यात आली. वेळेअभावी न्यायालयाने सुनावणी मंगळवारीपर्यंत तहकूब केली होती. आज पुन्हा या अर्जावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे आरोपीला आज जेलमध्ये रहावे लागणार की जामीन मिळणार, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

या अ‍ॅपमध्ये काय आहे? -

बुली बाई नावाच्या अ‍ॅपवर मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात होते. अ‍ॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अ‍ॅपच्या धर्तीवरच बुली बाई अ‍ॅपवर काम केलं जात होते. सुल्ली डील हे गीटहबवर लाँच झालं होतं. तर बुलीबाई देखील गीटहबवरच लाँच झालेले आहे.

हेही वाचा - ACB summoned : परमवीर सिंग हाजीर हो... लाचलुचपत विभागाने बजावले आदेश

Last Updated : Jan 18, 2022, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.