ETV Bharat / city

Bank Cheque Thief Arrest Mumbai : कपडा व्यापाऱ्याचा धनादेश चोरून वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक - Bank Cheque Thief Arrest Mumbai

दहिसर पूर्व आनंद नगर भागातील कपडा व्यापाऱ्याच्या अनुपस्थित (Cloth Merchant cheque theft) दुकानातून धनादेश चोरी (Bank Cheque Thief Arrest Mumbai) करून तो वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक (Dahisar Police Station) केली आहे. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश पटेल विरोधात फसवणूक लूट आणि चोरी समवेत अन्य काही गुन्हे नोंद आहेत. दोन महिन्यापूर्वीच आरोपीला बोरिवली पोलिसांनी चैन स्नॅचिंग प्रकरणात अटक केली होती. (Latest Crime News from Mumbai Dahisar)

आरोपी सुरेश पटेल
आरोपी सुरेश पटेल
author img

By

Published : Sep 22, 2022, 2:35 PM IST

मुंबई : दहिसर पूर्व आनंद नगर भागातील कपडा व्यापाऱ्याच्या अनुपस्थित (Cloth Merchant cheque theft) दुकानातून धनादेश चोरी (Bank Cheque Thief Arrest Mumbai) करून तो वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक (Dahisar Police Station) केली आहे. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश पटेल विरोधात फसवणूक लूट आणि चोरी समवेत अन्य काही गुन्हे नोंद आहेत. दोन महिन्यापूर्वीच आरोपीला बोरिवली पोलिसांनी चैन स्नॅचिंग प्रकरणात अटक केली होती. (Latest Crime News from Mumbai Dahisar)

कपडा व्यापाऱ्याचा धनादेश चोरून वटवण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

चोरीचा चेक वटविण्याचा प्रयत्न - आरोपीने कपडा व्यापाऱ्याशी मैत्री करून जवळीक साधत फिर्यादी दुकानात नसताना आरोपीने धनादेशाची चोरी केली. यानंतर त्याने तो चेक बँकेत वटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली; मात्र फिर्यादीच्या लक्षात आले नाही.

व्यवस्थापकाला चेक न वटविण्यास सांगितले - आरोपीने धनादेश वटवण्याचा प्रयत्न बँकेत केला असता बँकेकडून आपण सव्वा सहा लाखाचा धरादेश दिला आहे. तो आम्ही क्लिअर करू का ? अशी विचारणा करण्यात आली. यानंतर फिर्यादी गोंधळून गेला व मी असा चेक कुणालाही दिलं नाही; त्यामुळे तो तुम्ही वटवू नका, असे बँक व्यवस्थापनाला सांगितले.

मैत्री केल्यानंतर धनादेशाची चोरी - फिर्यादी हे कपडा व्यापारी असून ते दहिसर येथे राहतात. आरोपी पटेल यांनी एप्रिल महिन्यात तक्रारदाराबरोबर ओळख करून दुकानातून कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली. सातत्याने आरोपीचे या दुकानात येणे-जाणे सुरू झाले व दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. एक दिवस फिर्यादी दुकानात नसताना आरोपीने संधी साधून दुकानातून धनादेश चोरी केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.