मुंबई - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने ( National Crime Records Bureau ) प्रकाशित केलेली 2020 या वर्षांमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून सन 2020 मध्ये राज्यातून 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या आहे. त्यापैकी 40 हजार 252 महिलांचा शोध लागला, ही बाब राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात उघड समोर आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 18 ते 30 वयोगटातील महिलांचे बेपत्ता होण्याचे सर्वाधिक प्रमाण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रातून 2020 यावर्षी 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी तब्बल 23 हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे. महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा कमालीचा ऐरणीवर आला आहे. या महिलांबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 2020 यावर्षी राज्यातून 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी 23 हजार महिलांचा शोधच लागलेला नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झाली. महाराष्ट्रात 2020 यावर्षी मध्ये 2 हजार 163 हत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 564 महिलांचा समावेश होता. त्यापैकी 116 जणींची प्रेम प्रकरणातून, तर 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची माहिती आहे. हुंडाबळी गेलेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार 2020 यावर्षात महिलांविरोधातील सर्वाधिक गुन्हे 49 हजार 385 उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले होते. यामध्ये खून, बलात्कार, लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण, हुंडाबळी यासारख्या विविध गुन्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातून 63 हजार 252 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 23 हजार 157 जणींंचा शोध अद्याप लागलेला नाही. यामध्ये दीड हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मुली, महिला कुठे आहे, याबाबत पोलीस ठाण्यातील विशेष पथके शोध घेत आहेत. यात काही जणी प्रेमप्रकरणांतूनही निघून गेल्याचीही माहिती समजते.
2021 वर्षात 11 महिन्यात 999 गुन्ह्यांची नोंद - 2021 वर्षातील पहिल्या 11 महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी 999 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी 859 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र 140 बेपत्ता मुलींचा शोध अजूनही लागला नाही. आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यांची संख्या एक लाख 9 हजार 585 च्या घरात आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या असून 23 हजार 157 जणींचा शोध अजूनही लागलेला नाही. दीड हजार अल्पवयीन मुलींचा यात समावेश असून काही जणी प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे बोलले जाते.
हेही वाचा - CBI personnel Positive : मुंबई पोलिसांनंतर 68 सीबीआय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण