ETV Bharat / city

उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा - अबू आझमी - मुंबई हथरस पीडिता न्याय सपा कँडल मार्च बातमी

उत्तर प्रदेशात जंगलराज सुरू असून रोज अनेकांच्या हत्या केल्या जातात सरकार आणि तेथील गुंड एकमेकांच्या हातात हात घालून काम करत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे. यामुळे राष्ट्रपतीनी योगी सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि उत्तर प्रदेश मधील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी केली.

abu azmi demand  dismiss uttar pradesh yogi government at mumbai for hatras incident
उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा - अबू आझमी
author img

By

Published : Sep 30, 2020, 10:41 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशात जंगलराज सुरू असून रोज अनेकांचे मुडदे पाडले जात आहेत. माफिया आणि गुंड लोकांच्या हातात हात घालून हे सरकार रोज अनेकांचे जीव घेत असून हे सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी आज मुंबईत केली.

उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा

हेही वाचा - 'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण अत्यंत संतापजनक अन् लाजिरवाणी बाब'

हाथरस येथे मृत्युमुखी पडलेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी समाजवादी पार्टीकडून आज सीएसटी स्थानका समोर असलेल्या सेल्फी पॉइंट जवळ कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी आझमी यांच्या सोबतच मुंबई महापालिकेतील समाजवादी पार्टीचे सर्व नगरसेवक महिला संघटनेच्या पदाधिकारी आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात हाथरस येथे मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार, तिचा मृत्यू आणि त्यानंतर योगी सरकारने अंधारात केलेले तिचे अंत्यसंस्कार हे अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक बाब असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - हाथरस प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, खटला यूपीमध्ये न चालवता दिल्लीकडे वर्ग करण्याची मागणी

उत्तर प्रदेशात जंगलराज सुरू असून रोज अनेकांच्या हत्या केल्या जातात सरकार आणि तेथील गुंड एकमेकांच्या हातात हात घालून काम करत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे. यामुळे राष्ट्रपतीनी योगी सरकार तत्काळ बरखास्त करावे आणि उत्तर प्रदेश मधील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच मोदी आणि योगी सरकारच्या विरोधात ही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.