ETV Bharat / city

अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता - flood in maharashtra

राज्यात आलेल्या पूरस्थितीचा फटका सुमारे १७ हजार कुटुंबांना बसला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने बाधित कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच कोटी रुपये देण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले. त्यामुळे पूर व दरडीमुळे ३५ कोटींचे सरासरी नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेती, फळबागा उद्योग धंदेसहित आदीच्या नुकसानभरपाईचा आकडा वाढला जाणार आहे.

mantralay
mantralay
author img

By

Published : Jul 31, 2021, 5:10 PM IST

मुंबई - राज्यात आलेल्या पूरस्थितीचा फटका सुमारे १७ हजार कुटुंबांना बसला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने बाधित कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच कोटी रुपये देण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले. त्यामुळे पूर व दरडीमुळे ३५ कोटींचे सरासरी नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेती, फळबागा उद्योग धंदेसहित आदीच्या नुकसानभरपाईचा आकडा वाढला जाणार आहे.

४ लाख ३५ हजार लोकांना रेस्क्यू -

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २४ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे सुमारे दीड हजार गावांना फटका बसला. दरडी कोसळून दोनशेहून हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा फटका १४४६ गावांना बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४११, सांगली १०४, सातारा ४१६, पुणे ४२०, रत्नागिरी २५, रायगड ७० गावांचा समावेश आहे. दरडी कोसळून तसेच पुरामुळे २१३ लोकांचा मृत्यू झाला. तर २१ घरांचे नुकसान झाले असून ४ लाख ३५ हजार ८७९ लोकांना रेस्क्यू केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

१५ हजार मदतीची घोषणा

अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळल्याने हजारो कुटुंब बाधित झाली. दरड ग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींचा संपूर्ण उपचाराचा भार राज्य सरकार उचलेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे, अशा कुटुंबांना तातडीने १० हजार रुपयांची मदत तर ५ हजार धान्यासाठी देण्यात येणार असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. तसेच पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार करण्याचे स्पष्ट केले होते.

घर आणि मृत्यूंची भरपाई ३५ कोटींची -

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार पूर व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ४९५ गावं बाधित झाली आहेत. १६ घरे नामशेष तर ६ घरांचे नुकसान झाल्याचे राज्य शासनाने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे. १७ हजार कुटुंबाना आपत्तीचा फटका सहन करावा लागला. या बाधित कुटुंबाला १० हजारांची मदत आणि ५ हजार धान्यासाठी दिले जातील. राज्याच्या तिजोरीतून याकरिता २५ कोटी ५० लाखाचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. तर २१३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यांना ५ लाखांच्या मदतीची राज्य शासनाने घोषणा केली. त्यानुसार १० कोटी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. घरांची पडझड, दुर्घटनेतील मृत्यू, पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाच्या मदतीची ही आकडेवारी आहे. येत्या पंधरा दिवसात निधीचे वाटप होईल, असे सुत्रांनी म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.