मुंबई - दादरा- नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मोहन डेलकर यांच्या मुलाचे आरोप
अभिनव डेलकर याने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या एक वर्षापासून मोहन डेलकर हे प्रचंड तणावाखाली होते. दादरा व नगर हवेलीचे प्रशासन त्यांचा वारंवार छळ करत होते. त्यांना माणहानिकारक वागणूक देत असल्याचे त्याने म्हटले आहे. या मागचा हेतू म्हणजे मोहन डेलकर यांच्या कॉलेजवर नियंत्रण मिळविण्यासाठी व पुढील निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यासाठी जाणून बुजून त्रास दिला जात होता. हे सर्व दादरा -नगर हवेलीचे प्रशासन प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. डेलकर यांच्याविरोधात जाणून-बुजून कट-कारस्थान केले जाऊन त्यांना नाहक त्रास दिला जात होता.
हेही वाचा - हैदराबादमधील चित्रगुप्त मंदिर, भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
या अधिकाऱ्यांना धरण्यात आले जबाबदार
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकारी अपूर्व शर्मा, उपविभागीय अधिकारी मंदिरची जैन, पोलीस निरीक्षक मनोज पटेल, रोहित यादव, फतेहसिंह चोहाण, दिलीप पटेल या सर्वांनी मिळून मोहन डेलकर यांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत त्रास दिला असल्याचा आरोप डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी केला आहे. त्याबरोबरच मोहन डेलकर यांच्याकडे 25 कोटी रुपयांची मागणी करून खोट्या केसेस दाखल करून व इतर मार्गाने भीती दाखवून निवडणूक न लढवण्याचा करिता व कॉलेज वर असलेले नियंत्रण मिळवण्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा - अंबानींना धमकी देणारा जैश-उल-हिंदचा ग्रुप तिहार जेलचा