ETV Bharat / city

TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण - टीईटी घोटाळा आरोपी तुकाराम सुपे

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा ( TET Scam in Maharashtra ) प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. ( TET Scam Accused Tukaram Supe ) यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Former State Minister Abdul Sattar ) यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. परंतु, अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Former State Minister Abdul Sattar
माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Aug 8, 2022, 12:56 PM IST

Updated : Aug 8, 2022, 1:56 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा ( TET Scam in Maharashtra ) प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र, सुपे ( TET scam accused Tukaram Supe ) यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. ( Abdul Sattar in Trouble ) यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Former State Minister Abdul Sattar ) यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. परंतु, अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली : या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून, यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
हीना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.

काय म्हणाले अब्दुल सत्तार : या प्रकरणावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, २०१९ मध्ये टीईटीचा निकाल हा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. माझ्या मुलींनी परीक्षा दिल्या, पण त्या पास झाल्या नाहीत, त्या अपात्र ठरल्यात. शिक्षण खात्यामध्ये कोणीही माहितीच्या अधिकारात माहिती घेऊ शकतो. माझ्या संस्थेमध्ये २०१७ मध्ये माझ्या मुली नोकरीला लागल्या. तेव्हा त्यांनी परीक्षा दिली त्यात त्या अपात्र झाल्या. हे मला बदनाम करण्याचे काम असून, आमची चूक असेल तर माझ्या मुलींवर कारवाई करा. परंतु, नसेल तर ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला फासावर लटकवा.

माझ्या संस्थेकडून गैरकृत्य झाले असल्यास मी जबाबदार : का मागील चार वर्षांत माझ्या मुली कुठेही पास झाल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या अपात्रतेचा फायदा घेतला नाही. माझ्या मुली अपात्र असल्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. कुणाला वाटल्यास ते मी द्यायलासुद्धा तयार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. परंतु, उगाच कुणालाही बदनाम करण्याचे काम करू नये. तसेच, माझ्या शिक्षण संस्थेकडून माझ्या मुलींना पात्र ठरवण्याबाबत एकही कागद गेला असेल, तर त्याला पूर्णता मी जबाबदार असेन. तसेच, माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसलाच नाही. परंतु समाजात, राजकारणात बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे कारस्थाने केली जाऊ नयेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी स्वतः शासनाकडे करणार असल्याचही अब्दुल सत्तार यांनी सांगितला आहे.

विद्यार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर : अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून, या संस्थांमध्येच या मुलीही कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही मुली परीक्षेत अपात्र आहेत. टीईटीमध्ये गैरव्यवहार केलेल्या तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावाची यादी परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही मुलींच्या नावाचादेखील समावेश आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा देण्यास कायस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा : EXCLUSIVE : मुसळधार पावसाने पन्हाळा गड पुन्हा ढासळू लागला; पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती

Last Updated : Aug 8, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.