मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची'
आमिर खानच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमिर खानची कोविड -19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या घरी होम क्वारंटाईनमध्ये आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिरची तब्बेत ठीक आहे. आमिरच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
आमिर खान मुख्यमंत्र्यांच्या आला होता संपर्कात -
गेल्या दोन दिवसांपूर्वी आमिर खान हे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यामुळे मुख्यमंत्री आता क्वारंटाईन होणार का? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, त्यामुळे ते देखील उपचार घेत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जेजे रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री होम क्वारंटाईन होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ; तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या