ETV Bharat / city

Aaditya Thackeray On MNS : राजकीय स्टेजवर दाखवायची श्रद्धा नसते, ती हृदयात असते; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला - हनुमान चालिसावरुन आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका

श्रद्धा ही स्टेजवर दाखवायचे नसते ती हृदयात असते, असा टोला आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला ( Aaditya Thackeray On MNS ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
author img

By

Published : Apr 16, 2022, 7:55 PM IST

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa Recitation ) आणि मशिदीवरील भोंगे यावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला आहे. श्रद्धा ही स्टेजवर दाखवायचे नसते ती हृदयात असते, असा टोला आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला ( Aaditya Thackeray On MNS ) आहे. गिरगाव येथील संकटमोचन मंदिरात आदित्य ठाकरेंनी हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम बी आणि सी टीम करत आहे. हिंदुत्व ही श्रद्धेची गोष्ट आहे. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व करत नाही. 'रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये,' हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. मात्र, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी आणि सी टीमला जनतेने जास्त महत्त्व देऊ नये, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला आहे.

संकटमोचन मंदिरात आदित्य ठाकरेंनी हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली

विकास कोण करु शकते हे... - कोल्हापूर 'उत्तर'मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. जनतेचा महाविकास आघाडी सरकारवर ठाम विश्वास आहे. या विजयासाठी स्थानिक नेत्यांनी मेहनत घेतली असून, आपण त्यांचे आभार मानतो. विकास कोण करू शकतो हे जनतेने ओळखल्याने त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. कोल्हापूरात हिंदुत्ववादी मत देखील आम्हालाच मिळाली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरेंचं 'जय श्रीराम'; 'या' महिन्यात जाणार अयोध्या दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.