ETV Bharat / city

Aaditya Thackeray About Sanjay Raut : 'राऊतांचं पत्र बोलकं'; आदित्य ठाकरेंकडून 'त्या' पत्राचे समर्थन - aaditya thackeray on sanjay raut letter

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On ED ) यांनी केला. तसेच यासंदर्भातील पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ( Sanjay Raut letter to Vice President Venkaiah Naidu ) दिले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्या पत्राचे समर्थन करत, हे पत्रच ( Aaditya Thackeray about sanjay Raut ) बोलकं असल्याची मार्मिक प्रतिक्रिया दिली. येत्या काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

tourism minister aaditya thackeray about letter
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 9, 2022, 5:20 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On ED ) यांनी केला. तसेच यासंदर्भातील पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ( Sanjay Raut letter to Vice President Venkaiah Naidu ) दिले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्या पत्राचे समर्थन करत, हे पत्रच ( Aaditya Thackeray about sanjay Raut ) बोलके असल्याची मार्मिक प्रतिक्रिया दिली. येत्या काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांची मागणी -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती यांना पत्र लिहून चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा आरोप केला आहे. भाजपच्या नेते वारंवार अनिल देशमुख यांच्या कोठडीत टाकण्याची धमकी देत आहेत. जबरदस्ती दादागिरी केली जात आहे. बाहेरच्या यंत्रणा महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवत आहेत. काही जण सुपार्‍या घेऊन येतात आणि दोन दिवस धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी त्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

'संजय राऊत यांचे पत्र बोलकं'

मुंबईत आदित्य ठाकरे एका कार्यक्रमासाठी आले असता, पत्रकारांनी राऊतांच्या पत्राविषयी विचारणा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संजय राऊत यांचे पत्र बोलके आहे, त्याबद्दल अधिक बोलायची गरज नाही, अशी टिप्पणी करत राऊत यांचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. त्यामुळे आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on ED : 'झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र..' - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.